Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री! काँग्रेसने एकाच बदलात कोणते दोन लक्ष्य साधले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
punjab

मुक्तपीठ टीम

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर अखेर काँग्रेसचे दलित नेते चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री निवडीसाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये तळालाही नसलेले चन्नींचे नाव निवडले तरी कसे गेले, अशी चर्चा आता रंगली आहे. त्यात कॅप्टनची साथ सोडून गेलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची निरीक्षणे आणि टीम राहुल गांधींचा अभ्यास असल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत किशोरांनी पंजाबातील बदलत्या राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधले होते. पंजाबात तब्बल ३२ टक्के असणाऱ्या दलित मतांचा मुद्दाही टीम राहुलच्या चर्चेत होता. त्यात आप आणि अकाली दल-बसपाने या वर्गातूनच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री देण्याची घोषणा केल्याने काँग्रेस आधीच दलित मुख्यमंत्री निवडून त्या दोन्ही पक्षांवर डाव उलटवला आहे.

 

पंजाबमध्ये काँग्रेसने इतिहास घडवला!

  • पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दलित मुख्यमंत्री
  • काँग्रेसच्या या राजकीय खेळीने विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे.
  • चन्नी पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री असतील.
  • पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच दलित नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहेत.
  • आतापर्यंत फक्त जाट शीख समाजातूनच मुख्यमंत्री बनले आहेत.

 

काँग्रेसने का निवडला दलित समाजातून मुख्यमंत्री?

  • पंजाबमध्ये ३२% दलित मतदार आहेत.
  • यामध्ये शीख आणि हिंदू समाजातील दलितांचा समावेश आहे.
  • पंजाबमध्ये जाट सिख समाज फक्त १९% आहे, परंतु आतापर्यंत पंजाबी राजकारणावर त्यांचंच वर्चस्व राहिलं आहे.
  • यामुळेच आता राजकीय पक्षांनी आता दलित कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे.
  • दलितांना उच्च पदे देत जातीय ध्रुविकरणाचा प्रयत्न करण्यात आला.
  • काँग्रेसने थेट दलितांना मुख्यमंत्री बनवून दलितांना थेट मोठा संदेश दिला आहे.

 

काँग्रेसच नाही इतर पक्षांचेही दलित मतांवर लक्ष!

  • अकाली दलाने विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीसोबत युती केली आहे. जिंकल्यास दलित उपमुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले.
  • अकाली दलापासून विभक्त झाल्यानंतर भाजपने आम्ही निवडणुका जिंकलो तर आम्ही दलित आमदाराला मुख्यमंत्रीपद देऊ असे म्हटले आहे.
  • आम आदमी पक्षाने अनेकदा असे म्हटले आहे की, त्यांनी दलितांच्या सन्मानासाठी पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून हरपाल चीमा यांची नियुक्ती केली आहे.
  • दलितांना आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने चन्नी यांची अनपेक्षित निवडून विरोधी पक्षांसमोर पेच निर्माण केला आहे.
  • बसपाच्या अध्यक्षा मायावतींच्या नकारात्मक प्रतिक्रियेतून विरोधकांची अस्वस्थताच व्यक्त झाल्याचे मानले जाते.

Tags: BJPmayavatiआम आदमी पक्षकॅप्टन अमरिंदर सिंहचरणजीत सिंह चन्नीप्रशांत किशोरबसपामायावती
Previous Post

लोकशाहीर विठ्ठल उमप: श्रमिकांच्या चाळीतून विचारांची श्रीमंती फुलवत समाज जागवला!

Next Post

राष्ट्रवादी नेत्यांच्या जावयांच्या मागे भाजपाच्या सोमय्यांचा वक्री ग्रह!

Next Post
BJP-NCP

राष्ट्रवादी नेत्यांच्या जावयांच्या मागे भाजपाच्या सोमय्यांचा वक्री ग्रह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!