मुक्तपीठ टीम
आपण नेहमी फेरीवाल्यांना आपल्या घरातील जुने कपडे, मोबाईल देऊन नवीन भांडी देत असतो. अशावेळी आपण निष्काळजीपणा करून हे फेरीवाले कुठून आले?हे खरेच फेरीवाले आहेत का? याचा विचारही न करता त्यांना घरात बोलावतो. याचाच ते फायदा घेत आपला घात करतात. अशीच घटना काळाचौकीत घडली आहे. एका अज्ञात महिलेने जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असं सांगून महिलेला बेशुद्ध करून तिच्या सव्वा तीन महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण केले आहे.
नेमकं काय घडलं?
- काळाचौकी परिसरात राहणाऱ्या सपना मगदूम या आपल्या घरी एकट्याच होत्या.
- ही घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या सुमारास घडली आहे.
- एक ३० ते ३५ वर्षाची महिला जुन्या मोबाइलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचा सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला.
- सपना मगदूम यांची सव्वा तीन महिन्यांची मुलगी वेदा मगदूम ही पलंगावर झोपली होती.
- जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मखदूम जेव्हा आतल्या रूममध्ये जात होत्या तेव्हा आरोपी महिला पाठी मागून आली आणि तिने बेशुद्ध करण्याचे औषध सपना यांच्या नाकाला लावून त्यांना बेशुद्ध केलं.
- पलंगावर सव्वा तीन महिन्याच्या चिमुकलीला या महिलेने उचललं आणि आपल्या सोबत घेऊन पसार झाली.
अपहरण करणार्या महिला सीसीटीव्ही मध्ये कैद
- सपना मगदूम या जेव्हा शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांची लहान मुलगी वेदा पलंगावर नव्हती आणि जी महिला भांडी विकण्यासाठी आली होती तिने आपल्या बाळाचं अपहरण केल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
- पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात गुन्हा नोंदवला आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
- बाळाचं अपहरण करणार्या महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
- पोलिस या महिलेचा आणि बाळाचा शोध घेत आहेत.