Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किया मोटर्सची ईलेक्ट्रिक गाडी EV9 लवकरच, एका चार्जिंगमध्ये ५०० किमीपर्यंतची रेंज!

November 14, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
kia ev9

मुक्तपीठ टीम

दक्षिण कोरियाची सुप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी किया मोटर्स आपली ईव्ही लाइनअप वाढवण्याची योजना आखत आहे. या दिशेने वाटचाल करत, कंपनी आपल्या नवीन ईव्ही९ संकल्पनेच्या टीझरचा फोटो लाँच करणार आहे. लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये या टीझर फोटोचे अधिकृतपणे लाँचिंग करण्यात येणार आहे. समोर आलेल्या टीझर इमेजमध्ये या कारचे बाह्य प्रोफाइल पाहिले जाऊ शकते. यामधून ही कार मस्क्युलर आणि समोरून एक चौकोनी एसयूव्ही असल्याचे दिसते.

 

किया मोटर्सची ईव्ही९ देणार ५०० किमी पर्यंतची रेंज

  • कियाने या कारबद्दल इतर कोणतीही माहिती उघड केलेली नाही. परंतु, ईव्ही९ त्याच ई-जीएमप आर्किटेक्चरवर आधारित असेल ज्यावर हुंडाई सेव्हेन संकल्पना आधारित आहे.
  • १७ नोव्‍हेंबरला लॉस एंजेलिसमध्‍ये किया मोटर्ससह हुंडाई सेव्हेन कॉन्सेप्‍ट देखील लाँच करण्यात येईल.
  • या प्लॅटफॉर्मवर आधारित इतर मॉडेल्सप्रमाणे, किया ईव्ही९ च्या या व्हर्जनमध्ये मोठ्या लिथियम-आयन बॅटरी, सिंगल आणि ड्युअल-मोटर पर्यायांची क्षमता असण्याची शक्यता आहे.
  • त्याच वेळी, मिळालेल्या माहितीनुसार, ही कार एका चार्जमध्ये ५०० किमी पर्यंतची रेंज देईल.
  • किया ईव्ही९ संकल्पनेच्या निर्मितीचे हे व्हर्जन २०२३ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

सध्या, कियाची ईव्ही६ ही जगभर चर्चेत आहे. ही कार निवडक बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्या बाजारपेठांमध्ये या कारने चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेमध्ये, ही ईव्ही६ ज्यावेळेस लाँच करण्यात आली त्यावेळी बुकिंग सुरू झाल्याच्या काही तासांतच याची मोठ्याप्रमाणात विक्री झाली. कियाने हा दावा केला आहे की, जर ईव्ही६ ला फास्ट चार्जरने चार्ज केले तर, ते ११२ किमी अंतर पाच मिनिटांत आणि १८ मिनिटांत ३३० किमी पेक्षा जास्त अंतर पार करेल.


Tags: electric carkia motors ev9muktpeethSouth Koreaइलेक्ट्रिक कारकिया मोटर्सची ईव्ही९दक्षिण कोरियामुक्तपीठ
Previous Post

टपाल विभागाकडून एक डिसेंबरला पेन्शन अदालत, गोव्यासह सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश

Next Post

नॅशनल एल्युमिनियम कंपनीत ८६ जागांसाठी भरती

Next Post
nalco

नॅशनल एल्युमिनियम कंपनीत ८६ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!