Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्थानिक खादीचा जागतिक दर्जा! ‘स्वधा’ वस्त्रप्रावरणांची वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
swadha khadi

मुक्तपीठ टीम

खादी आता फक्त एक शब्द राहिलेला नाही, तर तो एक प्रतिष्ठित ब्रँड झाला आहे. आपल्या मातीतील या ब्रँड स्वदेशी असला तरी त्याचा दर्जा जागतिक असला पाहिजे, असा आग्रह असतो. त्यातूनच भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाच्या खादी उत्पादनांची निर्मिती आणि वितरण, विक्रीसाठी खादी संस्थांना मदत आवश्यक असते. त्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME मंत्रालयाने सेंटर फॉर एक्सेलन्सची स्थापना केली आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाने नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे या खादी केंद्रांची स्थापना केली आहे. या केंद्राने खादीचे अष्टपैलुत्व दाखवण्यासाठी ‘वेलनेस वेअर’याअंतर्गत वस्त्रप्रावरणांची ‘स्वधा’नावाची योगासाठीची नवीन श्रेणी निर्माण केली आहे.

सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादी या केंद्राने (COEK) ‘खादी स्पिरीट’ म्हणजे “पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्यासोबत सह-संवेदना” अशी संकल्पना पुढे आणत हीच भावना आपल्या केंद्राच्या माध्यमातून अधोरेखित करत पुढे आणली आहे.

संतुलन हे योगाचे मर्म आहे – केवळ शरीरांतर्गत संतुलन किंवा फक्त मन आणि शरीरातील संतुलनच नव्हे तर जगासोबत मानवी नातेसंबंधातील संतुलन हे देखील आहे.

योगाची ही मूळ विचारधारा लक्षात घेऊन,सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादी या केंद्रामधील डिझाइन चमूने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खादीचे अष्टपैलुत्व दाखवण्यासाठी ‘वेलनेस वेअर’याअंतर्गत वस्त्रप्रावरणांची ‘स्वधा’नावाची नवीन श्रेणी निर्माण केली आहे. अथर्ववेदात ‘स्वधा’ म्हणजे सहजता, आराम किंवा आनंद, जे खरोखरच या वस्त्रसंग्रहाचे गुणधर्म आहेत.

या वस्त्रसंग्रहातील वस्त्रप्रावरणे योग अभ्यासकांना आणि योगप्रेमींना वापरुन पहाण्यासाठी आणि त्यांचा अभिप्राय मागविण्यासाठी दाखविण्यात आली.

सामाजिक कार्यकर्त्या, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या आणि पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल किरण बेदी,यांनी या वस्त्रप्रावरणांच्या संकलनाला मान्यता मिळवून देण्यासाठी आणि डिझाइनरशी संवाद साधण्यासाठी निफ्ट येथील येथील केंद्राला भेट दिली. पर्यावरणवादी रिपू दमन बेवली यांनी स्वधा या वस्त्रप्रावरण‌संग्रहामधील वस्त्रे परीधान केली आणि खादीच्या कापडाने मिळणाऱ्या आरामाची प्रशंसा केली ज्यामुळे योगासने किंवा व्यायाम करणे सोपे होते.

‘स्वधा’ श्रेणीतील ही वस्त्रप्रावरणे सजगता आणि चिकाटी या मूल्यांवर भर देत असून सर्व वयोगटांना आकर्षित करण्याचा या वस्त्रसंग्रहाचा उद्देश आहे.या वेलनेस वेअरमध्ये नैसर्गिक रंगछटांमधील हाताने सूत कातून बनविलेल्या खादीचा वापर केलेला आहे. अशाप्रकारे खादीचा हा धागा खर्‍या अर्थाने जागतिक स्तरावर लोकांना ‘वसुधैव कुटुंबकम्’ – असे सांगत जग हे एकच कुटुंब आहे या भावनेने गुंफून टाकत आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Center of Excellence for Khadigood newslocal khadimuktpeethswadhaघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठसेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादीस्थानिक खादीस्वधा
Previous Post

मार्क झुकेरबर्ग यांनी दाखवले फेसबुक-इंस्टाग्रामद्वारे पैसे कमवण्याचे नवे मार्ग

Next Post

अन्न प्रक्रिया क्षेत्रात सरकारी मदतीने उद्योग उभारण्यासाठी २७ जूनपासून अर्ज करा!

Next Post
central food processing industry ministry

अन्न प्रक्रिया क्षेत्रात सरकारी मदतीने उद्योग उभारण्यासाठी २७ जूनपासून अर्ज करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!