मुक्तपीठ टीम
सध्या वाढत्या कोरोनामुळे संपूर्ण देशात कडक निर्बंध लादले आहेत. प्रशासनाने लादलेल्या नियमांचे लोकांकडून उल्लंघन होत असताना पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तर एका बाजूला कोरोना नियमांच्या जागरूकतेसाठी पोलिसांनी हटके अनोखा पर्याय शोधून काढला आहे.
सोशल मीडियावर केरळ पोलिसांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस रात्रीच्यावेळी भर रसत्यात डान्स करत आहे. या व्हिडीओमध्ये एकूण ९ पोलीस खाकी वर्दीत ‘एन्जॉय एनजामी’ या तामिळ गाण्यावर डान्स करत आहेत. केरळ पोलिसांनी कोरोनाच्या बाबत लोकांमध्ये जागृकता परसवण्यासाठी हा व्हिडीओ बनवला आहे.
മഹാമാരിയെ ഒത്തോരുമിച്ചു നേരിടാം. കേരള പോലീസ് എപ്പോഴും നിങ്ങളോടൊപ്പം #keralapolice #statepolicemediacentre #covid #coviddance #covid19 #police pic.twitter.com/Rb9RyV3Egv
— State Police Media Centre Kerala (@PoliceCentre) April 27, 2021
पोलिसांचा गाण्यातून कोरोना सुरक्षेचा सुंदर मेसेज
- या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत पोलिसांनी लोकांना मास्कचा वापरण्याचे तसेच लस घेण्याचे आवाहन केले आहे.
- हा व्हिडीओ शेअर करताना प्रत्येकाने लस घेतली पाहिजे, लसीकरणाचे महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.
- केरळ पोलिस नेहमीच तुमच्या सोबत आहेत. असंदेखील म्हटलं आहे.
- डान्सच्या माध्यामातून लोकांना मास्क व्यवस्थित घाला, हॅण्ड सॅनिटायजरचा वापर करा असं आवाहन करत आहेत.
- केरळ राज्य सरकारच्या राज्य पोलीस मीडिया सेंटरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
- २७ एप्रिलला फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
- आतापर्यंत या व्हिडीओला ३५ हजारांपेक्षा जास्त रिएक्शन्स मिळाल्या आहेत. ४२००० लाईक आणि १७००० कमेंट मिळाल्या आहेत.
- तसेच व्हिडीओला ‘हमें महामारी से मिलकर लडना चाहिए’असे कॅप्शनही दिले आहे.