Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माणगाव आयटीआयच्या बळकटीकरणसाठी टाटा मोटर्स इच्छुक ही अभिमानास्पद बाब

उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

April 30, 2021
in सरकारी बातम्या
0
aditi

मुक्तपीठ टीम

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), माणगाव येथे सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) अत्याधुनिक सुविधांमधून विद्यार्थ्यांना सखोल प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यास टाटा मोटर्स या आघाडीच्या कंपनीने पुढे येणे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

 

आयटीआय माणगाव येथे ऑटोमोबाईल ट्रेड सुरू करण्याबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या.

 

यावेळी कौशल्य विकास व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक अनिल जाधव, माणगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रशाली दिघावकर, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, माणगाव तहसिलदार प्रियांका कांबळे, माणगाव आयटीआयचे प्राचार्य चंद्रकांत पडलवार, टाटा मोटर्स प्रा.लि.चे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनी एक सादरीकरण केले. ज्यामध्ये ५ हजार चौ.फू. जागेच्या आवारात दिल्ली आयटीआय येथे ऑटोमोबाईल ट्रेड अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत त्यांनी माहिती दिली. ड्रायव्हींगसह गाड्यांचे सखोल प्रशिक्षण, क्लासरूम लेक्चर्स, ऑटोमोबाईल मॅकेनिक ट्रेड ज्यामध्ये वाहनाचे सर्व सुट्टे भाग हाताळणे व दुरुस्ती अशा रितीने दर्जेदार अभ्यासक्रमातून कुशल विद्यार्थी तयार होण्यास मदत होते, असे यावेळी सांगण्यात आले.

 

आयटीआय माणगाव येथे अशा प्रकारचे दर्जेदार प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आवश्यक जागेची पाहणी व सर्वेक्षण अहवाल तात्काळ तयार करावा, असे निर्देश राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांना दिले.

 

ऑटोमोबाईल ट्रेड क्षेत्राचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक व आवश्यक त्या सुविधा टाटा मोटर्सच्या सहभागातून आयटीआयला देण्यास तयार आहे. त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल, असे कौशल्य विकास व प्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी यावेळी सांगितले.

 


Tags: aditi tatkareऑटोमोबाईल ट्रेड क्षेत्रटाटा मोटर्समाणगाव आयटीआय
Previous Post

राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटींची मदत

Next Post

कोरोना सुरक्षा नियमांसाठी काठीला नाही चांस, पोलिसांचा ग्लोबल व्हायरल डांस!

Next Post
enjoy enjaami

कोरोना सुरक्षा नियमांसाठी काठीला नाही चांस, पोलिसांचा ग्लोबल व्हायरल डांस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!