मुक्तपीठ टीम
केरळ उच्च न्यायालयाने पर्सनल लॉ अंतर्गत मुस्लिमांचे लग्न पोक्सो कायद्याच्या कक्षेतून वगळले जाणार नाही असा निर्णय दिला आहे. विवाहातील मुलगी अल्पवयीन असेल तर, विवाहाची वैधता विचारात न घेता पोक्सो कायद्याखालील त्याचावर गुन्हा दाखल होईल. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ३१ वर्षीय मुस्लिम व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
पोक्सो कायदा : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी…
- न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांच्या एकल खंडपीठाने काही गोष्टी नमूद केल्या आहेत.
- ते म्हणाले पोक्सो कायदा हा विशेषत: लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेला एक विशेष कायदा आहे.
- बालकांवरील प्रत्येक प्रकारचे लैंगिक अत्याचार हा गुन्हा मानला जातो.
- यातून विवाह वगळलेला नाही.
बालविवाह समाजासाठी शाप!
- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ३१ वर्षीय मुस्लिम व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने हा निकाल दिला.
- त्याने असा युक्तिवाद केला की “त्याने मार्च २०२१ मध्ये मुलीशी तिला लागू असलेल्या वैयक्तिक कायद्यानुसार वैधपणे लग्न केले होते”.
- बालविवाह हे मानवी हक्कांचे उल्लंघन मानले जात असल्याचे न्यायालयाने सांगितले.
- बालविवाहामुळे मुलाच्या पूर्ण क्षमतेच्या विकासात तडजोड होते.
- समाजासाठी तो शाप आहे.
बलात्काराच्या आरोपी जोडप्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा!
- लक्षद्वीपच्या कावरत्ती येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये एका जोडप्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
- विशेष न्यायाधीश के अनिल कुमार यांनी लक्षद्वीपचे रहिवासी मूसा कुन्नागोठी आणि त्यांची पत्नी नूरजहाँ बंदरगोठी यांना १२ वर्षांखालील दोन मुलींवर बलात्कार आणि अश्लील हेतूने त्यांचे व्हिडिओ बनवल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
विवाहित असला तरी मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा!!
- पोक्सो कायद्यानुसार लग्नाच्या नावाखाली मुलाशी शारीरिक संबंध ठेवण्यास बंदी आहे.
- वैयक्तिक कायदा आणि प्रथागत कायदा हे दोन्ही कायदे आहेत.
- पोक्सो कायदा लागू झाल्यानंतर, लग्नानंतरही मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे.
- या कायद्याद्वारे दुर्बल, भोळे आणि निष्पाप मुलींचे संरक्षण करणे हाच उद्देश आहे.