Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड, रविवारपासून विशेष मोहीम!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
kisan credit card

मुक्तपीठ टीम

राज्यात प्रधानमंत्री किसान नोंदणीकृत एकुण १ कोटी १४ लाख ९३ हजार लाभार्थ्यांपैकी केवळ ८१ लाख ३६ हजार लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. राज्यात जवळपास ३३ लाख ५७ हजार पी. एम. किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्ड धारक नाहीत. यासाठी दि. २४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेत पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील. या ग्राम सभेमध्ये बँक प्रतिनिधी उपस्थित राहून ग्रामस्थांना या विषयी माहिती देणार आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी या विशेष ग्रामसभेस उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र शासनाच्या “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शकानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत पिक कर्ज, तसेच पशुधन / मस्त्यव्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या. सदरची मोहीम ही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून दि. २४ एप्रिल २०२२ ते १ मे २०२२ या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत पिक कर्ज तसेच पशुधन / मस्त्यव्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करण्यात येतील. या उपक्रमांतर्गत सामाजिक सुरक्षा योजना (प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, आणि अटल पेन्शन योजना) यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती, तसेच नवीन लाभार्थी नोंदणी करण्यात येईल.

 

केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली (SOP) उपलब्ध करून दिलेली असून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करून ही मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.

 


Tags: central Governmentgood newsKisan credit cardmuktpeethPradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojanaकिसान क्रेडिट कार्डकेंद्र शासनचांगली बातमीजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीप्रधानमंत्री किसान सन्मान निधीमुक्तपीठ
Previous Post

“शीतपेय थंड करण्यासाठी शुध्द पाण्यापासून बनविलेला बर्फ आवश्यक!”

Next Post

स्टार्टअपमधील कामगिरीचं कौतुक! दीपेन्द्र सिंह कुशवाह यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार!!

Next Post
दीपेन्द्र सिंह कुशवाह

स्टार्टअपमधील कामगिरीचं कौतुक! दीपेन्द्र सिंह कुशवाह यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!