Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शीतपेय थंड करण्यासाठी शुध्द पाण्यापासून बनविलेला बर्फ आवश्यक!”

भेसळयुक्त नमुने आढळणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईसाठी मोहीम

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
fda

मुक्तपीठ टीम

अन्न व औषध प्रशासनामार्फत सध्या बर्फ, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादींचे नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. भेसळयुक्त नमुने आढळणाऱ्या बर्फ, उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादी व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सु. आ. चौगुले यांनी सांगितले.

 

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जनतेस थंड सरबते, उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस व शीतपेय पिण्याची इच्छा होत असते. उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय थंड करण्यासाठी त्यामध्ये बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शुध्द पाण्यापासून बनविलेला बर्फ वापरणे आवश्यक आहे. बाजारामध्ये मिळणारा सर्व बर्फ शुध्द पाण्यापासून बनविलेला आहे याची खात्री देता येत नाही, त्यामुळे ग्राहकांनी शीतपेय विक्रेत्यांना बर्फाचा वापर कोणता केला आहे याबाबत विचारणा करावी. महाराष्ट्र शासनाने स्वाद बर्फ व अखाद्य बर्फ ओळखण्यासाठी अखाद्य बर्फामध्ये निळा फुड कलर वापरण्याची सक्ती उत्पादकांना केली आहे. काही बर्फ उत्पादक या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन, सांगली यांनी एप्रिल २०२२ पासून बर्फाचे ६ नमुने तपाणीसाठी घेतले असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

 

सांगली जिल्ह्यात परवानाधारक ५ बर्फ उत्पादक आहेत. सर्व बर्फ उत्पादकांनी खाण्याचा बर्फ पिण्यास योग्य पाण्यापासूनच बनवावा. उसाचा रस, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादी विक्रेत्यांनी खरेदी करीत असलेल्या बर्फाचे पक्के बिल घ्यावे व ज्या बर्फ उत्पादकाकडून त्यांना बर्फ येतो त्यांना तो खाद्य बर्फ आहे की अखाद् बर्फ आहे याबाबत विचारणा करावी. कोणतीही शंका तक्रार असल्यास १८००११२१०० या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चौगुले यांनी केले आहे.

 


Tags: commercial actionFood and Drug AdministrationForged samplesgood newsmuktpeethSangli districtSoft drinkअन्न व औषध प्रशासनचांगली बातमीभेसळयुक्त नमुनेमुक्तपीठव्यावसायिक कारवाईशीतपेयसांगली जिल्हा
Previous Post

भारतीय टीव्हीएस मोटरची ग्लोबल झेप! ब्रिटनच्या ‘नॉर्टन मोटरसायकल्स’मध्ये ९९५ कोटींची गुंतवणूक!!

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड, रविवारपासून विशेष मोहीम!

Next Post
kisan credit card

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड, रविवारपासून विशेष मोहीम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!