Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा मंत्र्यावर ४० टक्के कमिशनचा आरोप! कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
K S Eshwarappa

मुक्तपीठ टीम

कर्नाटकातील ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा यांच्यावर ४० टक्के कमिशनचा आरोप करत कंत्राटदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण तापू लागले आहे. त्या आत्महत्येमुळे भाजपा सरकारच्या अडचणी वाढत आहेत. केएस ईश्वरप्पा यांनी कंत्राटदार संतोष पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

उडुपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वरप्पा यांचे नाव या प्रकरणी प्रथम आरोपी म्हणून नोंदण्यात आले आहे. कंत्राटदार संतोष पाटील यांचा भाऊ प्रशांत पाटील यांनी मंत्री आणि त्यांचे सहकारी रमेश आणि बसवराज यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता.

 

‘राजीनामा देणार नाही’

ईश्वरप्पा म्हणाले, सुसाईड नोट हा खोटा प्रचार आहे. मी मुख्यमंत्री बोम्मई आणि पक्षाध्यक्षांना कळवले आहे की, मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तत्पूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्याशी वैयक्तिक बोलून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले.

केएस ईश्वरप्पा यांच्यावर कारवाईची मागणी

  • मंत्री केएस ईश्वरप्पा यांच्यावर कारवाईची मागणीसाठी विरोधकांनी जोर धरला आहे.
  • काँग्रेसने ईश्वरप्पा यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे, तर आम आदमी पक्षाने मंगळवारी सरकारविरोधात निदर्शने केली.
  • काँग्रेसने ईश्वरप्पा यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली.
  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बसवराज यांच्यावर निशाणा साधला होता.

मुख्यमंत्री बोम्मईंचे निष्पक्ष चौकशीचे आश्वासन

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
  • मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा जलद आणि निःपक्षपातीपणे तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • पोलिसांना प्रामाणिक आणि पारदर्शक तपासासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
  • सत्य बाहेर येऊ द्या, असे बोम्मई म्हणाले.
  • फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने पद्धतशीर, जलद, प्रामाणिक आणि पारदर्शक तपास करण्याचे निर्देश मी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे बोम्मई म्हणाले.

Tags: BJPK. S. Eshwarappakarnatakasantosh patilकंत्राटदार संतोष पाटीलकर्नाटककेएस ईश्वरप्पाभाजपा
Previous Post

विकृतीचा कळस! चांदोली नॅशनल पार्कमध्ये घोरपडीवर चौघांचा बलात्कार, व्हिडीओही बनवला!

Next Post

“लग्न होताच नसबंदी करावी तसं काँग्रेसमध्ये माझी अवस्था!” हार्दिक पटेलांची व्यथा कथा!

Next Post
Hardik Patel Congress

"लग्न होताच नसबंदी करावी तसं काँग्रेसमध्ये माझी अवस्था!" हार्दिक पटेलांची व्यथा कथा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!