Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंगनाविरोधात भाजप सत्तेतील कर्नाटकातही गुन्हा!

उच्च न्यायालयाचा गुन्हा रद्द करण्यास नकार!

March 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
kangana ranuat

मुक्तपीठ टीम

कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील कायथसंद्र पोलीस ठाण्यात कंगना रणौतविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आहे. कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी करण्याच्या आरोपाखाली तुमकूर जिल्ह्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करत चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशाला अभिनेत्रीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

कंगनाला एफआयआर रद्द करायचा होता
कंगनाच्या वतीने त्यांचे वकील रिझवान सिद्दीकी उच्च न्यायालयात हजर झाले. कंगनाच्या विरोधात एफआयआर रद्द करून ही कारवाई थांबविण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यास उत्तर म्हणून न्यायालयाने म्हटले आहे की, “आधी आपण न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करा, तरच आम्ही आपल्या मागणीवर विचार करू.” या खटल्याची पुढील सुनावणी १८ मार्च रोजी होईल.

नेमंक काय प्रकरण आहे

  • संसदेत कृषी कायदा संमत झाल्यानंतर २१ सप्टेंबर रोजी कंगनाने सोशल मीडियावर त्या कायद्यांच्याबाजूने आणि शेतकरी आंदोलकांविरोधात खूप लिहिले.
  • नागरिकत्व कायद्यावर चुकीची माहिती आणि अफवा पसरविणारे लोक आता कृषी कायद्यांवर खोटी माहिती पसरवित आहेत, ज्यामुळे देशात भीती पसरली आह. ते अतिरेकी आहेत.
  • कंगनाच्या या पोस्टवर आक्षेप व्यक्त करताना अ‍ॅड. एल. रमेश नाईक यांनी तिच्याविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. अन्नदात्यांविरोधातील कंगनाच्या पोस्टमुळे ते खूप दुखावले गेले आणि त्यामुळे त्यांनी कंगनावर गुन्हा दाखल केला, असे नाईक म्हणाले.
  • नाईक यांच्या तक्रारीच्या आधारे न्यायालयाने कायथसंद्र पोलिसांना कंगनाविरूद्ध एफआयआर नोंदविण्यास सांगितले. न्यायालयाने म्हटले होते की तक्रारदाराने सीआरपीसीच्या कलम १५५ (३) अन्वये अर्ज दाखल केला आहे आणि चौकशीची मागणी केली आहे.

 

कंगनाने अन्य तीन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

  • सोशल मीडियाच्या कमेंट्सवरून कंगना आणि तिची बहीण रंगोली यांनी मुंबईत दाखल झालेल्या तीन फौजदारी खटल्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
  • ही तीन प्रकरणे हिमाचल प्रदेशात वर्ग करावी अशी विनंती त्यांनी केली.
  • न्यायालयाने अद्याप या प्रकरणातील सुनावणीसाठी तारीख निश्चित केलेली नाही.

Tags: farmer lawkangana ranautkarnataka high courtकंगना रणौत
Previous Post

कॅरेक्टर्स फक्त २८०…शक्ती सत्तेला हादरवणारी!

Next Post

कांजूर मेट्रो कारशेडप्रकरणी केंद्राच्या अडवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

Next Post
kanjurmarg

कांजूर मेट्रो कारशेडप्रकरणी केंद्राच्या अडवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!