Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कांजूर मेट्रो कारशेडप्रकरणी केंद्राच्या अडवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kanjurmarg

मुक्तपीठ टीम

सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या कांजूरमार्ग मेट्रो ३ , ४ आणि ६ चे कारशेड उभारण्याची परवानगी घेण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कांजूरमार्गच्या मालकीवरून केंद्र व राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान एमएमआरडीएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, एमआरआरडीएने गेल्याच महिन्यात या भूखंडावर कारशेड उभारण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता अर्ज केला आहे.

न्यायालयाने सर्व याचिकांवर १२ मार्च रोजी सुनावणी घेऊ, असे नमूद केले. केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये कारशेड भूखंडाच्या मालकीवरून सुरू असलेला वाद योग्य ती यंत्रणा उभारून सोडविण्यात येऊ शकतो.

एमएमआरडीएने आपल्या अर्जात म्हटले

  • मेट्रो कारशेडची आवश्यकता जाणून दोन्ही पक्षांनी संबंधित जागा एमएमआरडीएला देण्याची तयारी दर्शविली आहे, असे अर्जात म्हटले आहे.
  • कारशेड उभारले नाही तर मेट्रो -३ (कुलाबा- वांद्रे- सीप्झ) मेट्रो -४ (कासारवडवली – वडाळा) आणि मेट्रो ६ (लोखंडवाला – विक्रोळी) च्या सेवा सामान्यांसाठी सुरू करता येणार नाहीत. लोकांची गैरसोय होईलच; पण आर्थिक नुकसानही होईल.
  • कांजूरमार्ग येथे कारशेडचे कोणतेही काम सुरू करण्यास उच्च न्यायालयाने १६ डिसेंबर २०२० रोजी स्थगिती दिली. ही स्थगिती उठविण्यासाठी एमएमआरडीएने अर्ज केला आहे.
  • उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने या भूखंडाची व्यवहार्यता पडताळली आणि तो योग्य असल्याचे आढळले.
  • हा फायदा पर्यायी भूखंडावर मिळणार नाही एमएमआरडीएने भूखंड मालकाला सर्व लाभ आणि नुकसानभरपाई देण्यास तयार आहे, असे एमएमआरडीएने अर्जात म्हटले आहे .

Tags: kanjurmarg plotmetro carshedMMRDASupreme Courtएमएमआरडीएकांजूरमार्गमेट्रो कारशेडसर्वोच्च न्यायालय
Previous Post

कंगनाविरोधात भाजप सत्तेतील कर्नाटकातही गुन्हा!

Next Post

ब्रिटनला ‘ऑक्सफोर्ड’ची लस भारतातून मिळणार, ‘सीरम’ पाठवणार एक कोटी डोस

Next Post
SII

ब्रिटनला 'ऑक्सफोर्ड'ची लस भारतातून मिळणार, 'सीरम' पाठवणार एक कोटी डोस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!