Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कर्नाळा बँक घोटाळ्याची आता दिल्लीतही चर्चा

March 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
karnala bank

मुक्तपीठ टीम

 

बहुचर्चित कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी देशाचे उपराष्ट्रपती वेकय्या नायडू यांनी लक्ष घातले असून, त्यांनी केंद्रिय अर्थ मंत्रालयाच्या सेक्रेटरींना याबाबत ठोस निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर गाजत असलेला कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण आता राजधानीतही चर्चेचा विषय बनला आहे. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना पत्र लिहून लक्ष वेधले होते.

 

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्यानंतर ५० हजार ठेविदारांच्या ५२९ कोटी रूपयांच्या ठेवी परत मिळविण्यासाठी आणि ५२६ कोटी रूपयांचा घोटाळा करणार्‍या संबंधित सर्व दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि सहकार्‍यांनी कायद्याची प्रत्येक बाजू चोखाळून सरकार आणि प्रशासनाला पत्रव्यवहार, बैठका, संबंधित अधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देवून राजकीय दहशतवादाच्या प्रचंड दबावामुळे अडगळीत पडलेल्या घोटाळा प्रकरणाला चांगलीच फोडणी दिली आहे. त्यामध्ये सीआयडी, ईडी आदी यंत्रणेलाही साकडे घातले आहे.

 

त्याचाच एक भाग म्हणून कडू यांनी १ जानेवारी २०२१ रोजी देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती वेकय्या नायडू यांना तीन पानी पत्र लिहून कर्नाळा बँकेच्या घोटाळ्याची इत्यंभूत माहिती दिली होती. नायडू यांनी त्या पत्राची दखल घेवून अर्थमंत्रालयाला याबाबत ठोस निर्देश देण्याचे आदेश अवर सचिवांना दिले. त्यानुसार उपराष्ट्रपती कार्यालयाचे अवर सचिव हुर्बी शकील यांनी केंद्रिय अर्थमंत्रालयाच्या सेक्रेटरींना उपराष्ट्रपतींच्या आदेशाची माहिती देवून तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यास सुचविले आहे.

 

या पत्रात हुर्बी शकील यांनी म्हटले आहे की, कांतीलाल कडू यांनी दिलेल्या पत्रात बँकेच्या घोटाळ्याबाबत संपूर्ण माहिती स्पष्ट केली आहे. ती माहिती जाणून घेवून लक्षपूर्वक कार्यवाही करावी. कडू यांनी दिलेले पत्र अतिशय पारदर्शक आणि घोटाळ्याबाबत स्पष्ट दुजोरा देणारे आहे.

 

या पत्राची प्रत उपराष्ट्रपती नायडू यांच्या कार्यालयातून कांतीलाल कडू यांना टपालाने पाठविण्यात आली आहे. त्यात कडू यांना केंद्रिय अर्थमंत्रालयाच्या सचिवांशी थेट संपर्क साधून याप्रकरणी पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यास सुचविले आहे.

“कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणाचे हिमनग बाहेर काढण्याचे भागिरथी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्य शासन, सहकार मंत्रालय, राज्याचे पोलिस दल, अंमलबजावणी संचनालय (ईडी) आदींशी पत्रव्यवहार केला आहे. प्रत्यक्षात अधिकार्‍यांसोबत बैठका घेवून हे प्रकरण सर्व सामर्थ्यानिशी गोवर्धनासारखे उचलून धरले आहे. त्याकामी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोर्‍हे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार खात्याचे सर्व उच्च पदस्थ अधिकारी सकारात्मकतेने ठेविदारांना न्याय देण्यासाठी सहकार्य करीत आहेत. परंतु, देशाचे उपराष्ट्रपती वेकय्या नायडू आणि त्यांच्या कार्यालयाने पनवेल संघर्ष समितीच्या पत्राची दखल घेवून सहकार्याचा हात पुढे करत न्यायिक लढ्याला उर्जेचा स्त्रोत पुरविणे खरंच अभिमानास्पद आहे”, असे कांतीलाल कडू यांनी म्हटले आहे.


Tags: delhikarnala bankkarnala bank scamकर्नाळा बँककर्नाळा बँक घोटाळा
Previous Post

चार वर्षात १७० आमदारांनी सोडला काँग्रेसचा हात, भाजपाच्या १८!

Next Post

डोंबिवलीत म्हैशीच्या वाढदिवसाची पार्टी ! कोरोना नियमांची ऐशीतैशी!!

Next Post
Buffalo birthday party

डोंबिवलीत म्हैशीच्या वाढदिवसाची पार्टी ! कोरोना नियमांची ऐशीतैशी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!