Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कपिल शर्माने राज कुंद्राला विचारलेलं, “काही काम न करता इतके पैसे कसे कमावता?” उत्तर आता मिळालं, वाचा चॅट्स!

July 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
kapil sharma

मुक्तपीठ टीम

उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न बनवून ते ॲपवर अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. दरम्यान, द कपिल शर्मा शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपिल शर्मा राजला त्याच्या कमाईबद्दल विचारत आहे. या व्हिडीओत कपिलने विचारलेल्या कमाई कधी आणि कशी करतो या प्रश्नाचे उत्तर आता पॉर्न प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हॉट्सअप चॅटवरून मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

 

ट्विटरवर एका यूजरने द कपिल शर्मा शोचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि शमिता शेट्टी कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते, त्यावेळच्या एका प्रसंगाचा व्हिडीओ आहे. कपिलने विचारले होते, “तुम्ही स्टार्ससह फुटबॉलचे सामने खेळताना दिसता, कधी तुम्ही फ्लाइटमध्ये दिसता, तर कधी शिल्पासह खरेदी करायला जाताना दिसता. पाजी, काहीही न करता पैसे कसे कमवतात हे आम्हाला देखील सांगा.” हे ऐकून शिल्पा, शमिता आणि सर्व प्रेक्षक खूप हसू लागले. शोमध्ये नवज्योतसिंग सिद्धूही हसताना दिसतात. चाहते या व्हिडीओवर कमेन्ट करत आहेत.

 

एकीकडे हा प्रश्न विचारणारा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच दुसरीकडे राजशी संबंधित चॅट उघड झाल्याने त्या प्रश्नाचे एक प्रकारे उत्तर मिळाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

राज कुंद्राच्या अटकेनंतर काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्या आहेत, ज्यावरून पॉर्नच्या धंद्यातून राजने मोठी कमाई केली असल्याचे उघड झाले आहे. व्हायरल व्हॉट्सअॅप चॅटवर एच अकाउंट्स नावाचा एक ग्रुप दिसत आहे, ज्याचा अ‍ॅडमिन राज आहेत. या ग्रुपवर राज आपले नातेवाईक आणि पॉर्न मूव्ही मेकर कॅनरीन प्रॉडक्शन हाऊसचे चेअरमन प्रदीप बक्षी यांच्याशी पैशांच्या व्यवहार आणि कंटेंट पोस्टिंगविषयी चर्चा करत आहेत.

 

१ राज कुंद्रांच्या कथित व्हॉट्सचॅप चॅटची चर्चा

  • अश्र्लील चित्रपट बनवण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे.
  • याप्रकरणात राज कुंद्रा आणि त्याचा जोडीदार प्रदीप बक्षीचे व्हॉट्सअॅप चॅट्स व्हायरल होत आहेत.
  • राज कुंद्राने स्वत:चा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून तो त्या ग्रुपचा अॅडमिनही आहे.
  • या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव “एच” अकाउंट्स होते.
  • राज कुंद्राशी संबंधित या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ५ सदस्य होते.

 

WhatsApp chats between Raj Kundra and Pradeep Bakshi!

Huge Money earned by distributing P0rRn Films 🎥! #RajKundra_Arrested #RajKundra pic.twitter.com/9Vv4wOC3gi

— 𝑳𝒊𝒇𝒆_𝒊𝒔_𝒂_𝒄𝒐𝒅𝒆_ 🐰(γ ) (@Remember2ndOct) July 20, 2021

२ चॅटमधून उलगडली ‘पॉर्न’ कमाई…कपिलच्या प्रश्नाचं उत्तर!

  • या चॅटमध्ये राज हॉटशॉट डिजिटल अॅप्लिकेशनच्या कमाईबद्दल बोलले गेले.
  • तर या चॅटमधून राज त्याच्या व्यवसायातून दिवसाला लाखो रुपयांची कमाई करत असल्याचं उघडकीस आलं आहे.
  • त्या चॅटमध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी दर आठवड्याला असा चित्रपट रिलीज करण्याविषयी बोलत होता.
  • या चॅटमध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी शोच्या कलाकरांच्या थकबाकी लवकर भरण्यासाठी बोलत आहेत.
  • या चॅट्समध्ये दैनंदिन उत्पन्न, अॅपच्या वाढणार्‍या ग्राहकांचा उल्लेखही आहे.
  • या चॅटमधून उघड होतं की राज अॅपवरील लाइव्ह शो मधून दररोज १ लाख ८५ हजार रुपये तर सिनेमांकडून चार लाख ५३ हजार रुपयांची कमाई होत होती.
  • दिवसाच्या कमाईचा हिशेबही ठेवला जात असे.
  • राजने प्रदीपला म्हटलं आहे की, त्याची एक कलाकार प्रिया सेनगुप्ता हिला पैसे मिळाले नसून लवकरात लवकर ते देण्यात यावे.
  • या चॅटमध्ये ८१ व्यक्तींना वेळेवर पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

 

pic.twitter.com/GrRUJlgN0c

— 𝑳𝒊𝒇𝒆_𝒊𝒔_𝒂_𝒄𝒐𝒅𝒆_ 🐰(γ ) (@Remember2ndOct) July 20, 2021

 

राज कुंद्राच्या पॉर्नतापाच्या सर्व बातम्या

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वादांची मालिका…

राज कुंद्रा आणि ‘मुंबई ते लंडन’ पॉर्नचा गंदा धंदा!

पॉर्नचा गुन्हा, राज कुंद्रा गजाआड…एक अभिनेत्री मदतीला, तीन विरोधात!

कपिल शर्माने राज कुंद्राला विचारलेलं, “काही काम न करता इतके पैसे कसे कमावता?” उत्तर आता मिळालं, वाचा चॅट्स!

राज कुंद्राचे पॉर्न’ताप’, शिल्पा शेट्टीला ताप!


Tags: mumbai policeraj kundraनवज्योतसिंग सिद्धूप्रदीप बक्षीराज कुंद्राशमिता शेट्टीशिल्पा शेट्टी
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपुरातही बैठका, कोरोनाविषयक आढावा घेत दिल्या प्रशासनाला सूचना

Next Post

महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट

Next Post
nitin raut

महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!