Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘गतिशक्ति योजने’मुळे ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास होईल

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन

August 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या “गतिशक्ति” योजनेमुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलून जाऊन नावीन्यपूर्ण सेवा, पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. ग्रामीण भागाचा सर्वंकष विकास या योजनेतून शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटिल यांनी  पत्रकार परिषदेत केले.

 

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्याच्या विविध भागांना भेट दिली. रघुजीराजे आंग्रे यांचे आशीर्वाद घेत यात्रेला सुरूवात केली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ. प्रशांत ठाकुर, यात्रा प्रमुख आ. निरंजन डावखरे, आ. रवी पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते आदि उपस्थित होते.

 

पाटील म्हणाले की, ग्रामीण भागाचा सर्वागिण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कटिबध्द आहे. गतीशक्ती योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत विकासाची कामे अधिक जलदगतीने करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्ती संदर्भात केंद्राचीच मदत सर्वप्रथम पोहोचत आहे. तळे येथील भूस्खलनग्रस्त गावालाही केंद्र सरकार मदत करेल. मात्र, राज्य सरकारनेही या गावकऱ्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरीत मदत देण्याची मागणी त्यांनी केली. नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतुकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही यासंदर्भात भेट घेतली असून ते या संदर्भात अनुकूल आहेत अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

 

यात्रे दरम्यान कपिल पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच अलिबाग येथील कोविड केंद्राना भेट देऊन आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शिरढोण येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले.

 


Tags: BJPkapil patilpravin darekarगतिशक्ति योजनाजन आशिर्वाद यात्राज्योतिरादित्य शिंदेपंतप्रधान नरेंद्र मोदीप्रवीण दरेकर
Previous Post

“सर्वसामान्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा”: डॉ. जितेंद्र आव्हाड

Next Post

सामान्य बँक ग्राहकांना बुडवण्याचा आरोप असलेल्या विवेक पाटलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त!

Next Post
vivek patil

सामान्य बँक ग्राहकांना बुडवण्याचा आरोप असलेल्या विवेक पाटलांना ईडीचा दणका...२३४ कोटींची मालमत्ता जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!