Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामान्य बँक ग्राहकांना बुडवण्याचा आरोप असलेल्या विवेक पाटलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vivek patil

मुक्तपीठ टीम

कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांची जवळपास २३४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचा समावेश आहे.

 

विवेक पाटील हे कर्नाळा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. या बँकेत सुमारे ६५० कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना १५ जूनला ईडीने अटक केली होती. त्यानंतर आज ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये कर्नाळा स्पोर्टस अकादमी तसेच त्यांच्या नावे असलेल्या जमिनींचा समावेश आहे.

 

कर्नाळा बँक लुटीविरोधातील संघर्षाला यश

  • कर्नाळा नागरी सहकारी बँक ही रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध बँक.
  • या बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार गेली अनेक वर्षे गाजत आहे.
  • माजी आमदार विवेक पाटील यांनी जवळपास ६३ बोगस खात्यांतून पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
  • ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू हे गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत.
  • पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनीही खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.
  • बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत काही महिन्यांपूर्वी मोर्चे देखील काढण्यात आले होते.

 

विवेक पाटलांमुळेच कर्नाळा बँक बुडाल्याचा आरोप

  • ईडीच्या चौकशीमुळे बँक आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर टांगती तलवार होती.
  • कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
  • त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Tags: EDkarnala bankmuktpeethVivek Patilईडीकर्नाळा नागरी सहकारी बँकमनी लॉँड्रिंगमुक्तपीठविवेक पाटील
Previous Post

‘गतिशक्ति योजने’मुळे ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास होईल

Next Post

“पंतप्रधान मोदींनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू”: डॉ. भारती पवार

Next Post
bharati pawar

"पंतप्रधान मोदींनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू": डॉ. भारती पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!