मुक्तपीठ टीम
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे ती राजकीय पातळीवरील वादात सापडली आहे. उद्धव ठाकरे आणि कंगनाचा वाद जगजाहीर आहे. आता अभिनेत्री कंगना रनौतने राजकारणातील एन्ट्रीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपाने निवडणूक तिकीट दिलं तर आपण हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून निवडणूक लढवायला तयार आहोत असं कंगनानं म्हटलं आहे.त्यासोबतच तिने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.
हिमाचलची सेवा माझ्यासाठी सौभाग्य!!
- अभिनेत्री कंगना रनौतने हिमाचल प्रदेशातील शिमला येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली.
- मी राजकीय कुटुंबातून आले आहे.
- माझे वडीलही राजकारणात होते.
- माझ्या वडिलांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कामं केली.
- पण २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर परिस्थिती सुधारली.
- माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल माहिती दिली.
- त्यानंतर २०१४ साली आमचं कुटुंब अधिकृतपणे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये आले.
- हिमाचल प्रदेशच्या जनतेने मला सेवेची संधी दिली तर चांगले होईल.
- माझ्यासाठी हे सौभाग्य असेल.
कंगनाला भाजपा तिकीट देणार का?
- कंगनाच्या या विधानाने लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री कंगना रनौतला भाजपा तिकीट देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- या कार्यक्रमात तिने मोंदींना राहुल गांधीसारख्या नेत्याला तोंड द्याव लागत आहे ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे म्हटलं आहे.
- तर राहुल गांधीसाठी दु:खद गोष्ट अशी की, त्यांचा सामना स्वत:शीच आहे.
- मोदीजींनाही माहीत आहे की, त्यांच्या कुणीच विरोधी नाही.
- ते स्वत: नेहमी जाण्याच्या वृत्तीनं काम करत राहतात.
- राहुल गांधी त्यांच्या त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत असल्याचे ती म्हणाली.