Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कमल हसन अटीतटीच्या लढतीत भाजपाकडून ८९० मतांनी पराभूत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kamal hassan

मुक्तपीठ टीम

 

तामिळनाडू राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. अण्णा द्रमुक आघाडीला खाली खेचून द्रमुक आघाडीने विजय मिळवला आहे. राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या हाय प्रोफाइल सीट्समध्ये राज्याच्या दक्षिणेस कोयंबतूरच्या जागेचाही समावेश होता. तिथे चित्रपटांमधून राजकारणात पदार्पण करणारे मक्कल निधी मय्यमचे (एमएनएम) प्रमुख कमल हसन यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव झाला आहे. भाजपाच्या उमेदवार वनाथी श्रीनिवास यांचा अवघ्या ८९० मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे कमल हसन यांचा  पक्ष खातेही उघडू शकलेला नाही. वनाथी श्रीनिवास या भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यांचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अभिनंदन केले आहे.

 

Congratulations @VanathiBJP on this victory. மனமார்ந்த வாழ்த்துக்கள். @BJPMahilaMorcha national president wins in the assembly election from Coimbatore South constituency. @BJP4TamilNadu @BJP4India https://t.co/CMId4p59cd

— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 2, 2021

कमल हसन यांचा सामना अण्णाद्रमुक-भाजप आघाडीच्या भाजपाच्या महिला मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन आणि द्रमुक-कॉंग्रेसचे आघाडीचे उमेदवार म्हणून कॉंग्रेस नेते मयुरा जयकुमार यांच्याशी होता. दुपारपर्यंत ते निवडून येतील असे चित्र होते, मात्र शेवटच्या फेरीत भाजपा उमेदवार वनाथी यांची मते वाढत गेली. अखेरीस ४५,०४२ मते मिळवूनही कमल हसन पराभूत झाले.

या विधानसभा निवडणुकीत कमल हसन यांनी आपला पक्ष एमएनएमच्या माध्यमातून तामिळ मतदारांना परिवर्तनाचे आवाहन केले होते.
कमल हसन यांनी अण्णा द्रमुक आणि द्रमुकचा पर्याय म्हणून सन २०१८ मध्ये एमएनएमची स्थापना केली. पक्षाने मागील लोकसभा निवडणूकही लढविली, परंतु त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. पण पक्षाला ७.७ टक्के मते मिळाली. चेन्नई आणि कोयंबटूर या शहरी भागात पक्षाला भक्कम पाठिंबा मिळवता आला होता. यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

 

आमदार कमल हसन यांचा पराभव झालेल्या मतदार संघांमध्ये कोण आणि किती?

• या विधानसभा मतदारसंघात मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार मोठ्या संख्येने आहेत.
• उत्तर भारतीय वंशाचे १२ टक्के उच्च जातीचे मतदार होते. ते भाजपचे समर्थक मानले जातात.
• या मतदारसंघात १० टक्के अल्पसंख्याक मतदार आहेत.

 

काय होती कमल हसन यांची आश्वासने?

• कमल हसन यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत लोकांना अनेक आश्वासने दिली.
• जर त्यांचा पक्ष जिंकला तर त्यांचे सरकार घरगुती महिलांना ५० लाख रोजगार आणि पगार देईल.
• सरकारी क्षेत्रात महिलांना ५० टक्के आरक्षण मिळेल.
• हसन यांनी सॅनिटरी नॅपकिन्स, महिलांचे संरक्षण, एकट्या मातांना पाठिंबा.
• सर्व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी
• तरुणांना ५० लाख रोजगार देणार.
• बेरोजगारी भत्त्यात सुधारणा करण्यात येईल.


Tags: अण्णाद्रमुक-भाजप आघाडीकमल हसनकॉंग्रेस नेते मयुरा जयकुमारडीएमके-कॉंग्रेस
Previous Post

“आजपर्यंत राज्यातील ११ लाख १० हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्याचा लाभ”

Next Post

पुद्दुचेरीत रंगास्वामींच्या एआयएनआरसीसह भाजपाची सत्ता, काँग्रेसचा धुव्वा!

Next Post
puducherry

पुद्दुचेरीत रंगास्वामींच्या एआयएनआरसीसह भाजपाची सत्ता, काँग्रेसचा धुव्वा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!