मुक्तपीठ टीम
तामिळनाडू राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. अण्णा द्रमुक आघाडीला खाली खेचून द्रमुक आघाडीने विजय मिळवला आहे. राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या हाय प्रोफाइल सीट्समध्ये राज्याच्या दक्षिणेस कोयंबतूरच्या जागेचाही समावेश होता. तिथे चित्रपटांमधून राजकारणात पदार्पण करणारे मक्कल निधी मय्यमचे (एमएनएम) प्रमुख कमल हसन यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव झाला आहे. भाजपाच्या उमेदवार वनाथी श्रीनिवास यांचा अवघ्या ८९० मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे कमल हसन यांचा पक्ष खातेही उघडू शकलेला नाही. वनाथी श्रीनिवास या भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यांचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अभिनंदन केले आहे.
Congratulations @VanathiBJP on this victory. மனமார்ந்த வாழ்த்துக்கள். @BJPMahilaMorcha national president wins in the assembly election from Coimbatore South constituency. @BJP4TamilNadu @BJP4India https://t.co/CMId4p59cd
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 2, 2021
कमल हसन यांचा सामना अण्णाद्रमुक-भाजप आघाडीच्या भाजपाच्या महिला मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन आणि द्रमुक-कॉंग्रेसचे आघाडीचे उमेदवार म्हणून कॉंग्रेस नेते मयुरा जयकुमार यांच्याशी होता. दुपारपर्यंत ते निवडून येतील असे चित्र होते, मात्र शेवटच्या फेरीत भाजपा उमेदवार वनाथी यांची मते वाढत गेली. अखेरीस ४५,०४२ मते मिळवूनही कमल हसन पराभूत झाले.
या विधानसभा निवडणुकीत कमल हसन यांनी आपला पक्ष एमएनएमच्या माध्यमातून तामिळ मतदारांना परिवर्तनाचे आवाहन केले होते.
कमल हसन यांनी अण्णा द्रमुक आणि द्रमुकचा पर्याय म्हणून सन २०१८ मध्ये एमएनएमची स्थापना केली. पक्षाने मागील लोकसभा निवडणूकही लढविली, परंतु त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. पण पक्षाला ७.७ टक्के मते मिळाली. चेन्नई आणि कोयंबटूर या शहरी भागात पक्षाला भक्कम पाठिंबा मिळवता आला होता. यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.
आमदार कमल हसन यांचा पराभव झालेल्या मतदार संघांमध्ये कोण आणि किती?
• या विधानसभा मतदारसंघात मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार मोठ्या संख्येने आहेत.
• उत्तर भारतीय वंशाचे १२ टक्के उच्च जातीचे मतदार होते. ते भाजपचे समर्थक मानले जातात.
• या मतदारसंघात १० टक्के अल्पसंख्याक मतदार आहेत.
काय होती कमल हसन यांची आश्वासने?
• कमल हसन यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत लोकांना अनेक आश्वासने दिली.
• जर त्यांचा पक्ष जिंकला तर त्यांचे सरकार घरगुती महिलांना ५० लाख रोजगार आणि पगार देईल.
• सरकारी क्षेत्रात महिलांना ५० टक्के आरक्षण मिळेल.
• हसन यांनी सॅनिटरी नॅपकिन्स, महिलांचे संरक्षण, एकट्या मातांना पाठिंबा.
• सर्व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी
• तरुणांना ५० लाख रोजगार देणार.
• बेरोजगारी भत्त्यात सुधारणा करण्यात येईल.