मुक्तपीठ टीम
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच सर्वोच्च न्यायालयातही कोरोना संसर्ग पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयातील ४४ कर्मचार्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे न्यायाधीश घरूनच व्हिडीओ कान्फरन्सिंगनं सुनावणी घेणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयात सुमारे ३४०० कर्मचारी आहेत. शनिवारी त्यांच्यापैकी ४४ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. आता सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज केला जाईल. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ त्यांच्या ठरलेल्या वेळेपेक्षा एक तास उशीरा बसतील. त्यामुळे साडेदहाची सुनावणी साडे अकरा आणि अकराची बारा वाजता सुरु होत जाईल.
न्यायाधीस यू यू ललित आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने साडेदहाऐवजी साडे अकरा वाजता काम सुरु केले. सर्वोच्च न्यायालयात आता थेट जाऊन मेन्शनिंग – प्रकरण मांडणे बंद करण्यात आले आहे. आता व्हर्चुअल सुनावणीत आपले म्हणणे मांडता येईल.