Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यायाधीशांची न्याय देण्यासाठी न्यायालयाच्या पार्किंगमध्ये धाव!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Chhatisgarh Korba Court

मुक्तपीठ टीम

तारखांवर तारखा, तारखांवर तारखा अशा शब्दात केवळ ‘घायाळ’ सनी देओल फिल्मी पडद्यावरच नाही, तर सर्वसामान्यही प्रत्यक्ष जीवनात घायाळ होत असतात. एकीकडे खुपणारी न्याय दिरंगाई तर दुसरीकडे न्यायाधीशांकडून न्यायासाठी केले जाणारे चाकोरीबाहेरचे प्रयत्न! कौतुक वाटावे असेच. छत्तीसगडच्या कोरबा येथील जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका प्रकरणात योग्य न्यायदानासाठी अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. एका दिव्यांग व्यक्तीचा त्रास ओळखुन सत्र न्यायाधिश बी. पी. वर्मा यांनी न्याय देण्यासाठी न्यायालयाच्या पार्किंगमध्ये धाव घेतली.

 

न्यायाधीशांची न्यायासाठी धाव

  • फिर्यादी व्यक्तीचे वय ४२ वर्ष आहे.
  • २०१८ मध्ये झालेल्या एका अपघातात या व्यक्तीला अनेक जखमा झाल्या.
  • त्यामुळे त्यांना पक्षाघाताने ग्रासले.
  • भरपाईच्या अपेक्षेने ते न्यायालयाबाहेर आले होते.
  • शारीरिक स्थितीमुळे त्यांना न्यायालयात आत जाता येत नव्हते.
  • हे समजल्यावर न्यायाधीशांनी न्यायालयाच्या बाहेर येऊन २० लाख रुपयांची नुकसान भरपाई त्या व्यक्तीला दिली.

 

जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. वर्मा यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरु होती. राष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज सुरु असताना पीडित व्यक्तीची अपघात नुकसानभरपाई प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. जेव्हा त्यांना फिर्यादीच्या वैद्यकीय स्थितीची माहिती मिळाली. तेव्हा ते न्यायालय कक्षातून बाहेर आले आणि न्यायालयाच्या आवारातील पार्किंग भागात गेले, जिथे ते फिर्यादी वाहनात थांबले होते.

 

पिडीत व्यक्तीचे वकील पी एस राजपूत आणि प्रतिवादी विमा कंपनीचे वकील रामनारायण राठोड न्यायाधीशांसोबत पार्किंगमध्ये गेले, जिथे त्यांनी हा निकाल दिला. न्यायाधीशांनी विमा कंपनीला पीडित व्यक्तीला २० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

 

नेमकी काय घटना?

  • डिसेंबर २०१८ मध्ये कोरबा जिल्ह्यातील रायगड शहरातील माणिकपूर भागात एका कारची ट्रेलरला धडक बसल्याने ही व्यक्ती अत्यंत जखमी झाली होती. अपघातात त्यांचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला.
  • त्यानंतर त्याला अर्धांगवायूही झाला.
  • यामुळे ते अंथरुणावरच होते.
  • त्यांच्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगून पिडीत व्यक्तीने विमा कंपनीकडे भरपाई मागितली.
  • तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यावरील निर्णयानंतर पीडित व्यक्तीने न्यायालयाचे आभार मानले.

Tags: b.p.varmaChhatisgarhjusticekorbaSession Judge B. P. Vermaकोरबाछत्तीसगडन्यायसत्र न्यायाधीश बी. पी. वर्मा
Previous Post

पोटनिवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे ओबीसी उमेदवार! पण खुल्या प्रवर्गातील बंडखोरांचे काय करणार?

Next Post

“सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही?”

Next Post
BJP OBC pc 14-9-21

"सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!