मुक्तपीठ टीम
अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, लेडी मेडिकल ऑफिसर, नर्स, सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिक, मेसन, प्लंबर, माळी, शिपाई, चौकीदार, वॉर्ड बॉय, मजदूर, सफाई कामगार या पदांवर एकूण ४० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०३ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण अहमदनगर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) एमबीबीएस २) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात डिप्लोमा
- पद क्र.२- एमबीबीएस
- पद क्र.३- जीएनएम डिप्लोमा किंवा नर्सिंग बीएससी
- पद क्र.४- १) ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण किंवा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा/ डी.एड/ बी. एड २) सीटीईटी/ सीईटी ३) एमएस-सीआयटी
- पद क्र.५- १) पदवीधर २) संगणकावर इंग्रजी टायपिंग किंवा मराठी/ हिंदी टायपिंग ३) एमएस-सीआयटी
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) मेसन आयटीआय
- पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) प्लंबर आयटीआय
- पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) माळी कोर्स
- पद क्र.९, १०, ११ साठी- १०वी उत्तीर्ण
- पद क्र.१२, १३ साठी – ०७वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १ आणि २ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २३ ते ३५ वर्ष तर, पद क्र. ३ ते १३ साठी उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला/ तृतीयपंथीय उमेदवारांकडून ३५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, एएमएक्स चौक, कॅम्प, भिंगार, अहमदनगर- ४१४ ००२ या ठिकाणी अर्ज पाठवावा.
अधिक माहितीसाठी अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://ahmednagar.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://drive.google.com/file/d/1eCP9OnE-Uhi4NkLmd975s1uOfGVslpj2/view
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1lJ-2EUwNPtPpnu-OHmFt5O4WXeUbVwrD/view