Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आंदोलनात प्राणार्पण केलेल्यांच्या वारसांना एसटीत नोकरी

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं
0
maratha

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षणासाठी आंदोलनासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. आता मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. आंदोलकांच्या वारसांना एसटी महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महामंडळाकडून मृत्यू झालेल्या ३५ आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु ३५ पैकी सहा जणांनी एसटीतील नोकरीत स्वारस्य दाखविले नसले तरी आणखी १२ आंदोलकांच्या वारसांना एसटीत नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर लवकरच एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

 

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेकांचे प्राणार्पण

  • आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका वारसाला एसटीत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय सप्टेंबर २०२० मध्ये एसटी महामंडळाने घेतला.
  • वारसदार सज्ञान नसल्यास व शिक्षण घेत असल्यास त्याच्या वयाची २५ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्या नेमणुकीचा हक्क राखून ठेवता येईल.
  • परंतु त्याकरिता कुटुंबाने सदरचे परिपत्रक प्रसारित झाल्यापासून एक वर्षांच्या आत तसा अर्ज सादर करणे आवश्यक आहे असेही नमूद केले.
  • यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर प्रत्यक्षात वारसांची माहिती पोलीस व अन्य यंत्रणांमार्फत महामंडळाला मिळेपर्यंत काही कालावधी गेला.
  • त्यानंतर नोकरी देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली.

 

आतापर्यंत दहाजणांना नोकरी, काहींचे अर्ज राखून ठेवले!

  • वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३५ आंदोलकांच्या वारसांपैकी १० जणांना एसटीत शैक्षणिक अहर्तेनुसार नोकरी देण्यात आली आहे.
  • तर काही तांत्रिक मुद्यांमुळे सहा जणांचा अर्ज राखून ठेवण्यात आला आहे.
  • एका उमेदवाराची माहिती मिळत नसल्याचे सांगितले.
  • याशिवाय एसटीतील नोकरीत आणखी सहा जणांनी स्वारस्य दाखविलेले नाही.
  • एसटीची आर्थिक स्थिती, कमी वेतन, अन्यत्र मिळालेली नोकरी इत्यादी कारणे ही नोकरीत स्वारस्य नसल्यामागील असल्याचे सांगितले.

 

मराठा आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचे अर्ज नाकारले

  • ३५ आंदोलकांच्या वारसांना एसटीत नोकरी देण्यासाठी प्रयत्न होत असतानाच आणखी सात जणांचे अर्जही आले होते.
  • परंतु त्यांचा मराठा आंदोलनाशी संबंध नसल्याने ते अर्ज नाकारण्यात आले.
  • मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या काही वारसांना नोकरी मिळाली आहे.
  • आता एसटीत विविध पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार आणखी बारा जणांना नोकरी देण्याचा प्रस्ताव आहे.
  • या प्रस्तावावर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

Tags: job opportunityMaratha ReservationSTएसटी महामंडळमराठा आरक्षण
Previous Post

सरसंघचालकांनी ड्रग-ओटीटी-बीटकॉइन-लोकसंख्या नियंत्रणाकडे वेधले लक्ष, मंदिर नियंत्रण मुक्ती आणि प्लास्टिक मुक्तीचाही सांगितला मंत्र!

Next Post

सर्वात मोठ्या भगवा ध्वजाची नगरमधील भूईकोट शिवपट्टण किल्ल्यात प्रतिष्ठापना

Next Post
Swarajya Flag

सर्वात मोठ्या भगवा ध्वजाची नगरमधील भूईकोट शिवपट्टण किल्ल्यात प्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!