मुक्तपीठ टीम
सेंट्रल बँक ऑफ इंडियात इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी- स्केल ५, इकोनॉमिस्ट- स्केल ५, डाटा सायंटिस्ट- स्केल ४, रिस्क मॅनेजर- स्केल ३, आयटी एसओसी अॅनालिस्ट- स्केल ३, आयटी सिक्योरिटी अॅनालिस्ट- स्केल ३, टेक्निकल ऑफिसर क्रेडिट- स्केल ३, क्रेडिट ऑफिसर- स्केल ३, डाटा इंजिनीअर- स्केल ३, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी- स्केल ३, रिस्क मॅनेजर- स्केल २, लॉ ऑफिसर- स्केल २, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी- स्केल २, सिक्योरिटी- स्केल २, फायनांशियल एनालिस्ट- स्केल २, क्रेडिट ऑफिसर- स्केल २, इकोनॉमिस्ट- स्केल २, सिक्योरिटी- स्केल १ या पदांसाठी एकूण ११० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदव्युत्तर पदवी/ पदवी किंवा एमसीए किंवा डाटा एनालिस्ट/ एआय अॅंड एमएल/ डिजिटल/ इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी २) १० ते १२ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) इकोनॉमिक्स/ बँकिंग/ कॉमर्स/ इकोनॉमिक पॉलिसी/ पब्लिक पॉलिसी या क्षेत्रात पीएचडी २) ०५ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) सांख्यिकी/ अर्थमिती/ गणित/ वित्त/ अर्थशास्त्र/ संगणक विज्ञान, कॉम्प्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स/ आयटी क्षेत्रात बीई/ बीटेक २) ८ ते १० वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) ५५% गुणांसह बीएससी किंवा ५५% गुणांसह एमबीए/ फायनान्स/ बँकिंग क्षेत्रात पीजीडीबीएम किंवा सांख्यिकी/ अप्लाईड मॅथ्स/ ऑपरेशन रिसर्च/ डेटा विज्ञान क्षेत्र २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ ईसीई इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी क्षेत्रात एमएससी २) ०६ वर्षे अनुभव
- पद क्र.६- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ ईसीई इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी क्षेत्रात एमएससी २) ०६ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) सिव्हिल/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ मेटलर्जी/ टेक्सटाईल/ केमिकल इंजिनीअरिंग पदवी २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.८- १) सीए/ सीएफए/ एसीएमए + ०३ वर्षे अनुभव किंवा फायनान्समध्ये एमबीए + ०४ वर्षे अनुभव
- पद क्र.९- १) कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रात सांख्यिकी/ अर्थमिती/ गणित/ वित्त/ अर्थशास्त्र/ संगणक विज्ञान किंवा कॉम्प्युटर सायन्स/ आयटी बीई/ बीटेक २) ०५ वर्षे अनुभव
- पद क्र.१०- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ ईसीई इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी क्षेत्रात एमएससी २) ०६ वर्षे अनुभव
- पद क्र.११- १) ५५% गुणांसह बीएससी किंवा ५५% गुणांसह एमबीए/ फायनान्स/ बँकिंग क्षेत्रात पीजीडीबीएम किंवा सांख्यिकी/ अप्लाईड मॅथ्स/ ऑपरेशन रिसर्च/ डेटा विज्ञान क्षेत्र २) ०१ वर्षे अनुभव
- पद क्र.१२- १) एलएलबी पदवी २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.१३- १) कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.१४- १) पदवीधर २) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान ५ वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी
- पद क्र.१५- सीए किंवा फायनान्स एमबीए + ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.१६- ६०% गुणांसह पदवीधर+ एमबीए/ बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात पीजीडीबीएम किंवा आयसीएआय परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र.१७- १) किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.१८- १) पदवीधर २) भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान ५ वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://centralbankofindia.co.in/en वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://ibpsonline.ibps.in/cbiosep22/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1oxon89sAvE3tRjRaYd8F-xXYMY0HCK2M/view