मुक्तपीठ टीम
ग्रामीण भागात तसेच छोट्या शहरांसारख्या भागात आजही आरोग्य सुविधा म्हणाव्या तशा उपलब्ध नसतात. जी उपलब्धता असते तीही पुरेशी नसते. हे ओळखून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिक्षणाच्या जोडीनेच आरोग्यावरही भर दिला आहे. निमशहरी, ग्रामीण भागाच्या आरोग्य सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिजाऊच्यावतीने ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये नियमितरीत्या आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जातं. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून नुकतेच भिवंडी शहरमध्ये आरोग्य महाशिबीर संपन्न झाले. त्याचा लाभ १२०० हून अधिक गरीब गरजू रुग्णांनी घेतला.
फकरुल उलुम, मस्जिद देवनगर नालापार नारपोली येथे आरोग्य महाशिबिराचं आयोजन जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं. ह्या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, जनरल तपासणी, दंतचिकीत्सा, कोरोना लसीकरण इत्यादी सर्वच प्रकारच्या आजारावर प्राथमिक तपासणी व औषधोपचार करून ऑपरेशन आवश्यक असणाऱ्या रुग्णांची नोंदणी करण्यात आली. जवळपास १२०० हून अधिक रुग्णांची नोंदणी करून त्यांची तपासणी, औषध व्यवस्था आरोग्य महाशिबिरात करण्यात आली. ३०० लोकांचे मोफत लसीकरण करण्यात आलं. ४०० लोकांची नेत्र तपासणी करून २०० रुग्णांना चष्मे, ७३ लोकांचं मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे. ३५ रुग्णांवर इतर ऑपरेशन गरजेचे आहेत. त्यांना तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई इथे मोफत ऑपरेशन करीता नेण्यात येणार आहे.
हे आरोग्य महाशिबिर यशस्वी करण्याकरिता भिवंडी शहर संपूर्ण टीम, फकरुल उलम मस्जिद देवनगर नालापार नारपोली येथील अॅड. गुफरान मोमीन, अल्फला बॉईज ग्रुप ह्या सर्वांनी महत्वपूर्ण सहकार्य केले.