Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

या हिवाळ्यात चला दक्षिणेकडे…म्हैसूर, उटी, कुन्नूरसाठी रेल्वेच्या खास ऑफर

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, निसर्ग
0
दक्षिण भारत

मुक्तपीठ टीम

आयआरसीटीसी ही पर्यटनाच्याबाबतीत नेहमीच अग्रेसर असते. आयआरसीटीसी नेहमीच भन्नाट टूर प्लान सादर करते. आता हिवाळा असल्याने हा पर्यटकांच्या फिरण्याचा आणि पर्यटनांचा सुंदर काळ. अशा परिस्थितीत अनेकजण बाहेर जाण्याचा बेत आखतात. हिवाळ्याच्या मोसमात बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक लोक थंड हवेच्या ठिकाणांवर जातात. पण, हिवाळ्याच्या दृष्टीने अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे आपण फिरायला जाऊ शकतो. यापैकी एक ठिकाण म्हणजे भारताच्या दक्षिणेला असलेली राज्ये.

 

या हिवाळ्यात तुम्ही कर्नाटकातील म्हैसूर, उटी आणि कुन्नूरला फिरायला जाऊ शकता. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेली ही तिन्ही ठिकाणे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. कर्नाटकातील या तीन ठिकाणांना भेट देण्याची योजना आखत असलेल्या पर्यटकांसाठी आयआरसीटीसी एक अतिशय आलिशान हवाई टूर पॅकेज देत आहे. आयआरसीटीसीने या टूर पॅकेजला साऊर्थन सोजर्न- म्हैसूर उटी अॅंड कुन्नूर (SOUTHERN SOJOURN – MYSORE OOTY & COONOR) असे नाव दिले आहे.

 

दक्षिणेकडील पर्यटनासाठी हवाईटूर पॅकेजचे आयोजन

  • कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरून या प्रवासाला सुरुवात होणार आहे.
  • कोलकाता येथून पर्यटक बेंगळुरूला जातील. बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर प्रवासी रस्त्याने म्हैसूरला रवाना होतील.
  • म्हैसूरला पोहोचल्यावर प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबवले जाईल, जेथे पर्यटक दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचा आनंद घेतील.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून प्रवासी म्हैसूर पॅलेसला भेट देतील, त्यानंतर दुपारचे जेवण करून प्रवासी वृंदावन गार्डन आणि नंदी मंदिराला भेट देतील.
  • यानंतर पर्यटक हॉटेलमध्ये परततील आणि रात्रीची विश्रांती घेतील.
  • दुसऱ्या दिवशी पर्यटक मुदुमलाईच्या जंगलातून उटीला रवाना होतील.
  • हे ठिकाण निलगिरीच्या सुंदर टेकड्यांमध्ये वसलेले आहे.
  • जगप्रसिद्ध कुरुंजी फूलही उटीमध्येच पाहायला मिळते. या फुलाची खास गोष्ट म्हणजे कुरुंजी फुल १२ वर्षातून एकदाच फुलते.
  • उटीला भेट दिल्यानंतर, पर्यटक हॉटेलमध्ये परततील आणि येथे रात्री विश्रांती घेतील.
  • न्याहारीनंतर दुसऱ्या दिवशी पर्यटक बोटॅनिकल गार्डन आणि उटी लेकला भेट देतील.
  • दुपारच्या जेवणानंतर प्रवासी कुन्नूरच्या प्रवासासाठी रवाना होतील.
  • कुन्नूर हे सुंदर दृश्य आणि चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. कुन्नूरला भेट दिल्यानंतर प्रवासी हॉटेल उटीला परततील.
  • उटीमध्ये रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर, पर्यटक दुसऱ्या दिवशी नाश्ता करतील आणि बंगळुरू विमानतळावरून कोलकात्याला परततील.
  • आयआरसीटीसीच्या चार रात्री आणि ५ दिवसांच्या या हवाई टूर पॅकेजसाठी तुम्हाला २५,४६० रुपये खर्च करावे लागतील.

पाहा व्हिडीओ:


Tags: coonoreIndiaIndian Railwayirctcmuktpeethmysoreootysouth india tourismआयआरसीटीसीउटीकुन्नूरदक्षिण भारतमुक्तपीठम्हैसूररेल्वे ऑफरहवाई टूर पॅकेज
Previous Post

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे निधन! शतायुषी महाजीवनावर अखेरचा पडदा…

Next Post

ग्रामीण भागात आरोग्य सक्षमीकरण, ‘जिजाऊ’ची आरोग्य शिबिरं

Next Post
'जिजाऊ'ची आरोग्य शिबिरं

ग्रामीण भागात आरोग्य सक्षमीकरण, 'जिजाऊ'ची आरोग्य शिबिरं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!