मुक्तपीठ टीम
एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे नवी मुंबई परिसरात पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत आहे. धर्मेश बाराई यांनी स्थापन केलेल्या या संस्थेनं स्थानिक नागरिक, स्थानिक मनपा आणि इतर यंत्रणांच्या सहकार्यानं पर्यावरण रक्षणासाठी सतत, निरंतर कार्य सुरु ठेवलं आहे. यातील नवं काम आहे. नेरुळ परिसरातील ज्वेल ऑफ नवी मुंबई या तलावाच्या स्वच्छतेचं काम. सीवूड्स आणि नेरुळसाठी त्या परिसरातील तलाव महत्वाचे आहेत. मात्र, गेली काही वर्षे या तलावांमध्ये जलपर्णीचा प्रादूर्भाव वाढला. जलपर्णीमुळे तलावातील पाण्याचा जिवंतपणा कमी होऊ लागला. जलपर्णीमुळे पाण्यात खाली सूर्यप्रकाश जात नाही. पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यात डासांचा प्रादूर्भाव वाढतो. त्यामुळे परिसरासाठी हा तलाव वरदानापेक्षा शाप ठरु लागला. तक्रारी येताच एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशनने स्थानिकांना आवाहन केले. त्या आवाहनानुसार सूर्योदय बँक, टीएस चाणक्य, पुनर्वशु फाउंडेशन, डिव्हाईन फाउंडेशन, NMMC ग्राउंड स्टाफ, रोट्रॅक्ट क्लब, इनर व्हील क्लब आणि स्थानिक नागरिक पुढे सरसावले.
यासर्वांनी एकत्र येत तलावातून जलपर्णी काढण्यास सुरुवात केली. पहिल्याच टप्प्यात २००हून अधिक स्वयंसेवकांसह सुमारे ३ ट्रक जलपर्णी काढण्यात आले.
तलावाच्या स्वच्छतेमुळे जलजीवन चांगले होऊन पक्ष्यांच्या प्रजातींना फायदा होतो. नैसर्गिक जैवविविधता वाढते. त्यांना सुरक्षित अधिवास मिळू शकतो. तसेच परिसरातील भूजल वाढण्यास मदत होते.
एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशनचे संस्थापक धर्मेश बाराई यांनी जलशक्ती मंत्रालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्व पाणथळ जागा आणि जलस्रोतांचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी जलाशयांचे संवर्धन करणे, आवश्यक असून एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशन त्यासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी ‘मुक्तपीठ’ शी बोलताना सांगितले.
तलाव स्वच्छतेत सहभागी पर्यावरणवीर!
- अमन गुप्ता
- रोहित ढोले
- राहुल रासकर
- भव्य पुजारी
- विजयश्री शिंदे
- सौम्या मेंडा
- सोहन भोसले
- प्रशांत पी.आर
- दीपक पोतदार
- तृप्ती बाराई
- राहुल संखे
- उषा संखे
- प्रीती तेलंग
- विद्या कौटिन्हो
- त्रिशा दुआ
- पंकज
- तनुजा कोल्हे
- स्नेहल कनोजिया
- पियुष ओझरकर
- पुनर्वसु फाउंडेशन
- टीएस चाणक्य पदाधिकारी आणि कर्मचारी
- स्थानिक नागरिक
- विजय नाईक, अजित तांडेल या नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांंनीही या तलाव स्वच्छता मोहिमेत महत्वाची कामगिरी बजावली.
World Environment Day
Week 94 #MangrovesCleanup Drive team working towards wetland and water conservation.
200+ volunteers removed 3 trucks of Water Hyacinth from Merul Jewel of Navi Mumbai Lake.@MoJSDoWRRDGR @moefcc @MahaEnvCC @swachhbharat @mpcb_official @NMMCCommr @sunnyagro pic.twitter.com/Z53uYfm39x— Environment Life Foundation (@EnvironmentLife) June 5, 2022