Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रदीप भिडे यांचं निधन: टीव्ही बातम्यांमधील एक पर्व संपलं…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
veteran news anchor pradeep bhide no more

मुक्तपीठ टीम

नमस्कार, आजच्या ठळक बातम्या…एक भारदस्त आवाज घुमायचा. जे टीव्हीसमोर नसायचे त्यांचेही पाय टीव्ही असेल तिथं वळायचे. तिथं असणारे हातात कितीही महत्वाचं काम असो टीव्हीकडे मान वळवायचे. बातम्या संपल्यानंतरच लोक टीव्हीपासून दूर व्हायचे. तो काळच वेगळा होता. तो काळ भारदस्त आवाजात, संयमित शैलीत बातम्या सादर करणाऱ्या प्रदीप भिडेंचा होता. खरंतर ते एक पर्व होतं. त्यामुळेच मराठीतील पहिलं खासगी न्यूज चॅनल झी २४ तास लाँच झालं तेव्हा सातच्या बातम्यांचे निवेदक प्रदीप भिडेच असणं आवश्यक मानले गेलं होतं!

भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांच्या जाण्यानं काही पिढ्यांना आपलसं करणारा आवाज गमावल्यासारखं वाटलं.

२४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी एकेकाळी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम असताना प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती. १९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर १९७४ पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते. त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेले वृत्तनिवेदन अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

प्रदीप भिडे यांनी सुरुवातीला एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केले होते. त्यानंतर ते रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून नाट्यक्षेत्राशी जोडले गेले होते. त्यानंतर प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनमधून वृत्तनिवेदनास सुरुवात केली.  प्रदीप भिडे यांनी शेकडो कार्यक्रम, सभा यांचे सूत्रसंचालन केले होते. तसेच त्यांनी हजारो जाहिरातींनाही आवाज दिला होता.
प्रदीप भिडे यांचे आई-वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण हे ग्रामीण भागात झाले. त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. तिथे विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर रानडेमधून त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.


Tags: journalistPradeep BhideZee 24 Taasझी २४ तासप्रदीप भिडे
Previous Post

राज्यात १८८१ नवे रुग्ण, ८७८ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post

जलपर्णींच्या विळख्यातून ज्वेल ऑफ नवी मुंबई तलावाची सुटका, पर्यावरण योद्ध्यांचा लढा

Next Post
Environment Life Foundation

जलपर्णींच्या विळख्यातून ज्वेल ऑफ नवी मुंबई तलावाची सुटका, पर्यावरण योद्ध्यांचा लढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!