Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणाऱ्या १७ उद्योजकांचा ‘ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ने सन्मान

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Brand Maharashtra award

मुक्तपीठ टीम

शून्यातून उद्योगविश्व तयार करणारे आणि कोरोनाकाळात शेकडो कुटुंबांचा आधार बनलेल्या उद्योजकांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. ‘फ्रेम मी मीडिया’ आणि ‘मीडिया माइंड ॲड्स” यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या यशोगाथा ‘ब्रँड महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. ‘ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ समन्वयक समितीचे महासचिव अभिजीत राणे, व्यवस्थापकीय संचालक भरत शिंदे, समन्वयक सचिन नारकर, कार्यवाहक विजय तिवारी यावेळी उपस्थित होते. भविष्यात देखील अशा होतकरु ब्रॅण्ड्सना सन्मानित करत राहू, असा मानस पुढचं पाऊल ट्रस्टचे संचालक भरत शिंदे यांनी व्यक्त केला.

 Brand Maharashtra award

“महाराष्ट्राचे खरे ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. महाराष्ट्राच्या या ब्रँड त्रिशूळाला विसरता येणार नाही. असं असताना काही जण महाराष्ट्राचं नाव बदनाम करत आहेत. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पिछाडीवर आहे अशा वल्गना केल्या जात आहेत. त्यांच्यासाठी ‘ब्रँड महाराष्ट्राचा’ पुरस्कार सोहळा आणि इथे जमलेले यशस्वी उद्योजक हे एकप्रकारचं उत्तर आहे. कोविड काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या इथे जमलेल्या ‘महाराष्ट्राच्या ब्रँड’ने अशीच यशाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत, ” असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी काढले. पुढचं पाऊल ट्रस्ट पुरस्कृत फ्रेम मी मिडिया आणि मिडिया माईंड ॲड्स आयोजित ‘ब्रँड महाराष्ट्राचा’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ आणि शेफ तुषार प्रीती देशमुख यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना ममता सिंधुताई सकपाळ म्हणाल्या, “खरं तर हा सन्मान माझा नाही तर माझी आई माई सिंधुताई सकपाळ यांचा आहे. खरं तर आईच्या कार्याला सीमा नव्हती. त्या वाटेवरून चालणं एक प्रकारचं आव्हान आहे. ते मी स्वीकारतेय.अजून खूप मोठी मजल मारायची आहे..”

 Brand Maharashtra award

याप्रसंगी प्रसाद पाटील आणि निलेश पाटील (निवारा ग्रुप ऑफ कंपनीज), विक्रांत उर्वल (आयआयटीसी ग्लोबल करियर्स), करणजीत सिंग (विथ यू फाउंडेशन ), मयूर देशमुख (ऍग्रोवन फाउंडेशन), अवधूत साठे (अवधूत साठे ट्रेडिंग अॅकॅडमी), डॉ. ओमप्रसाद पडते (मुक्ता रीअॅलिटी), कौशिक भाई मधुभाई कोटिया (योगेश्वर ग्रूप ), अभिजीत घोरपडे (ग्रीनफिल्ड अॅग्रिकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड), संकेत आवटे (संकेत आवटे फाईन टेक प्रायव्हेट लिमिटेड), डॉ. पांडुरंग कदम (संकल्पा एचआरडी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे), सुनील राठोड (फिनिक्स लँडमार्क), गजानन दळवी (लोकत्रयाश्रय इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड), अमित दळवी (समिरा इन्नोव्हेशन), कन्हैया कदम (सर्वज्ञ हॉस्पिटल अँड के.के. इंडस्ट्रीज, नांदेड), ॲड सुयोग पगाडे (स्वराज्य इन्फ्रास्ट्रक्चर) या सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Brand Maharashtra awardEntrepreneurFrame Me Mediagood newsMedia Mind Adsmuktpeethउद्योजकचांगली बातमीफ्रेम मी मीडियाब्रॅण्ड महाराष्ट्रमीडिया माइंड ॲड्समुक्तपीठ
Previous Post

जलपर्णींच्या विळख्यातून ज्वेल ऑफ नवी मुंबई तलावाची सुटका, पर्यावरण योद्ध्यांचा लढा

Next Post

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

Next Post
MYLAP

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!