Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार”: जयंत पाटील

September 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
jayant patil

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

आजरा तालुक्यातील मौजे आर्दाळ येथे जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्यावतीने आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी खासदार संजय मंडलिक,आमदार प्रकाश आबीटकर,आमदार राजेश पाटील,आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार संजय घाटगे, पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, पाटबंधारे कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, एस.आर. पाटील, अमोल नाईक, डी. डी. शिंदे, उपविभागीय अभियंता दिनेश खट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकऱ्याची सोय होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश येऊन आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचा लाभ घेऊन येथील शेतकरी या भागाचं सोनं करतील, असा विश्वास व्यक्त करुन या प्रकल्पासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांना धन्यवाद दिले.

जलसंपदा विभागाचे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी, सर्पनाला, नागणवाडी, उचंगी व सोनुर्ले हे सर्व प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले असून यासाठी गतीने कार्यवाही केली जाईल असे जयंत पाटील यांनी सांगितले.

मेघोली धरण फुटल्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करणार असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी चिंता करु नये, असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील प्रकल्पग्रस्तांच्या त्यागामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जलसंपदा विभागाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील वेळोवेळी बैठका घेऊन त्यासाठी पाठपुरावा करतात. यामुळे जलसंपदा विभागाचे राज्यातील सर्व प्रकल्प लवकरच मार्गी लागून शेतकऱ्यांची सोय होईल, असा विश्वास व्यक्त केला.

आंबेओहोळ प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांबरोबरच पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण दूर होण्यास निश्चित मदत होईल, असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

 

रिक्षा, ट्रक, टॅक्सी ड्रायव्हर, शेतमजूर आदी घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्यादृष्टीने यांच्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन होण्याबाबत गणेशोत्सवानंतर बैठक घेण्यात येईल, असेही यावेळी हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले.

 

या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ३३.८४ चौरस किलोमीटर असून एकूण पाणीसाठा ३५.११ दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठा ३२.६३ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामुळे ३ हजार ९२५ हेक्टर क्षेत्र ( ६ हजार ३५९ हेक्टर सिंचन क्षमता ) सिंचनाखाली येणार आहे. धरणाची लांबी २२५० मिटर आहे. यामुळे आजरा व गडहिंग्लज या दोन तालुक्यातील २१ गावांना लाभ होणार आहे, असेही महेश सुर्वे यांनी सांगितले.

 

आभार कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी मानले. आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण होण्यासाठी योगदान दिलेल्या अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार संजय पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Tags: jayant patilMinister Hasan Mushrifआंबेओहोळ प्रकल्पग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफजलसंपदा मंत्री जयंत पाटील
Previous Post

“लोकशाही भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने!”: पृथ्वीराज चव्हाण

Next Post

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीसांच्या स्वागतासाठी ‘मी पुन्हा येईन’ व्यंगचित्र!

Next Post
NCP-BJP

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीसांच्या स्वागतासाठी 'मी पुन्हा येईन' व्यंगचित्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!