Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“‘आयत्या बिळावर नागोबा’ सारख्यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे”

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jayant Patil -11

मुक्तपीठ टीम

 

सांगली – “ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रिय केला त्यावर ‘आयत्या बिळावर नागोबा’ सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी शरद पवारसाहेबांच्यावर चुकीचं विधान करणार्‍या चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

“विरोधी पक्षात आहात. जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाही पण चुकीचं बोलणार्‍यांचं इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हे,” असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. “चंद्रकांत पाटील यांना पक्ष कसा टिकवायचा याची चिंता पडली आहे त्यामुळे पाहिजे ते वारेमाप बोलत सुटले आहेत.” असेही जयंत पाटील म्हणाले.

“पुण्यातल्या एका अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का?” असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.  “मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ जीवापाड जपला त्यांना बाजुला करुन प्रसंगी आपल्या अधिकाराचा वापर करून चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ सोडून, स्वतःचा जिल्हा सोडून दुसरीकडे निवडणूक लढवावी लागली. त्या महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला,” अशी घणाघाती टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.


Tags: chandrakant patiljayant patilmuktpeethsharad pawarचंद्रकांत पाटीलजंयत पाटीलमुक्तपीठशरद पवार
Previous Post

क्रीडा थोडक्यात: १) सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पोटाच्या दुखापतीसह ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील आपला ३००वा विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने प्रवेश केला. जोकोव्हिचने स्वित्झर्लंडच्या १४व्या मानांकित मिलोस राओनिकला ७-६ (७-४), ४-६, ६-१, ६-४ असे चार सेटमध्ये नमवले. २) आयपीएल लिलावाच्या आधी अर्जुन तेंडुलकरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रविवारी पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट अ च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अर्जुनने आपण फक्त गोलंदाज नाही तर वेळ पडली तर धमाकेदार फलंदाजी देखील करू शकतो हे दाखवून दिले. त्याने ३१ चेंडूत ७७ धावांची वादळी खेळी केली. त्यात त्यांनी ५ चौकार आणि आठ षटकार मारले.

Next Post

यावल-बऱ्हाणपूर राज्यमहामार्गावर पपयांचा ट्रक पलटला, रावेर तालुक्यातील १६ कामगार जागीच ठार

Next Post
tempo accident

यावल-बऱ्हाणपूर राज्यमहामार्गावर पपयांचा ट्रक पलटला, रावेर तालुक्यातील १६ कामगार जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!