Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंचं आगमन, देवेंद्र फडणवीसांचं संपलं भाषण! जयंत पाटील म्हणतात “हे टायमिंग दाखवतं संगनमत!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NCP vs BJP & MNS

मुक्तपीठ टीम

१ मे हा दिवस राजकीयदृष्ट्या चांगलाच गाजला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारी झालेल्या सभेच्या टायमिंगची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाबाबत पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक झाला. यातून संगनमत आहे हे सिद्ध होत आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.

फडणवीस आणि राज ठाकरेंचं संगनमत!

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
  • मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील भाषण संपले आणि त्यानंतर राज ठाकरे औरंगाबादमधील स्टेजवर भाषणासाठी मंचावर चढले.
  • फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाबाबत पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक झाला.
  • यातून संगनमत आहे हे सिद्ध होतेय, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
  • राष्ट्रवादी आणि खासकरुन शरद पवार यांच्यावर बोलले तरच कव्हरेज मिळते.
  • त्यामुळे राज ठाकरे सतत शरद पवार यांच्यावर बोलत आहेत.

जबरदस्त टायमिंग! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं औरंगाबादेत सभास्थानी आगमन,
विप नेते देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत भाषण संपलं.

— Tulsidas V. Bhoite 🌸 (@TulsidasBhoite) May 1, 2022

राज यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपाची!

  • राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणात मला काहीच दम वाटला नाही.
  • भाषणात नवीन काहीच मुद्दे नव्हते.
  • मागील सभेत जे मुद्दे मांडले गेले तेच मुद्दे या भाषणात होते.
  • त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखे नाही असे दिसत आहे.
  • महागाईवर बोलून मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या-शाप द्यायचे असतील तर द्या.
  • पण राज साहेबांनी महागाईवर पण बोलावे.
  • पण ते बोलत नसल्याने राज यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपाने लिहून दिलीय असे दिसतेय.

राज ठाकरेंची दबावामुळे शरद पवारांवर टीका!

  • शरद पवारांचा द्वेष करा, त्यांच्याविरोधात बोला, अशी स्क्रिप्ट राज ठाकरे यांना कुणीतरी दिली आहे.
  • ती स्क्रिप्ट वाचण्याचा दबाव राज ठाकरेंवर दिसतोय आणि त्यामुळे ते काही कारणामुळे नाईलाजास्तव शरद पवारांवर टीका करत आहेत.
  • त्यामुळे भाषणावेळी राज ठाकरे यांची फारच केविलवाणी अवस्था दिसली.
  • शरद पवार यांच्याविरोधात जितके जास्त बोलता येईल आणि महाराष्ट्रामध्ये जातीयवादी विष कालवून धर्माधर्मात तेढ निर्माण करुन समाजात विष कसे पसरवता येईल यासाठी जितके जास्त कसे चिथावणीखोर बोलता येईल तसा प्रयत्न राज ठाकरेंच्या भाषणातून दिसत होता.

नेमकं काय घडलं?

  • रविवारी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित जाहीर सभा पार पडली.
  • तर मुंबईत देवेंद्र फडणवीसांची बुस्टर डोस सभा होती.
  • या दोघांच्या सभा येत्या मनपा निवडणुकांसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या.
  • राज ठाकरे साडेसात वाजता या सभेला पोहोचणार होते. मात्र, राज ठाकरे ७ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास मैदानात पोहोचले आणि ८ वाजून ३ मिनिटांनी राज ठाकरे भाषणासाठी उभे झाले.
  • राज ठाकरेंचे औरंगाबादमधील मैदानात आगमन झाले आणि मुंबईतील बुस्टर सभेतील देवेंद्र फडणवीसांचे भाषण संपले होते.
  • त्यामुळे राजकीय वर्तुळात फडणवीस आणि राज ठाकरेंच्या या टायमिंगची चर्चा रंगली आहे.

Tags: Aurangabaddevendra fadanvisjayant patilRaj Thackerayऔरंगाबादजंयत पाटीलदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रराज ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

शेतकरी आंबा बाजार ठाणे : आजवर चाखले नसतील ते आंबेही!

Next Post

कोकणाने शिवसेनेला भरपूर दिलं, शिवसेनेनं कोकणाला काय दिलं? – सदाभाऊ खोत

Next Post
Sadabhau Khot And Cm Uddhav Thackeray

कोकणाने शिवसेनेला भरपूर दिलं, शिवसेनेनं कोकणाला काय दिलं? - सदाभाऊ खोत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!