मुक्तपीठ टीम
नाव स्त्री शक्ती आणि कार्यही स्त्री शक्ती दाखवणारेच. पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून भोजन पुरवठा करते. जव्हारमधील या संस्थेच्या मध्यवर्ती स्वयंपाकघरातील महिलांनी नुकताच वेळात वेळ काढून खास महिलांचा सांस्कृतिक सोहळा साजरा केला. या सोहळ्यात सर्वात रंगत आली ती आदिवासी कलावंतांच्या तारपा वादन आणि त्यावरील महिलांच्या तारपा नृत्यानं….
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांचा सन्मान व्हावा म्हणून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. स्त्रीशक्ती संस्था देशातील सहा राज्यात कार्यरत आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागा अंतर्गत असलेल्या एकोणतीस आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृह आतून भोजन पुरवठा करते.
जव्हार मधील विनवळ येथे हे स्वयंपाकगृह आहे. या मध्यवर्ती स्वयंपाकगृहमध्ये महिलांना स्त्री शक्तीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तेथेच महिला दिनानिमित्त महिलांच्या सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. स्थानिक कलावंतांच्या तारपा वादनाच्या तालावर स्थानिक महिलांनी कधी तारपा नृत्याचा फेरा धरला ते त्यांनाही कळलं नसावं, इतके सारे त्याने मोहून गेले.
यावेळी येथील महिलांना जागृती बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या प्रतिनिधी तृप्ती केदारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तर मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या व्यवस्थापिका सुवर्णा पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात महिलांनी आनंदाने सहभाग घेऊन पारंपारिक नृत्य ठेका धरला
जन्मभूमीचं ऋण फेडण्यासाठी समाजकार्य…
स्त्रीशक्ती संस्थेच्या संस्थापिका मनिंदर कौर बेदी पालघर जिल्ह्यात राहून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर सामाजिक क्षेत्रात उतरल्या मुंबईमध्ये काही महिलांना एकत्र करून संस्थेची स्थापना केली ज्या भागात आपण राहिलो त्या भागाचा आपण काही देणे लागतो त्यामुळे त्यांनी पालघर सारख्या ग्रामीण भागात शाळांच्या आहार पुरवठ्याचा कामाला सुरुवात केली आणि ग्रामीण गरजू महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पावलं टाकत आहेत.