Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एमएसएमई इनोव्हेटिव्ह स्कीम आणि एमएसएमई आयडिया हॅकॅथॉनचा शुभारंभ

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
MSME idea hackthon

मुक्तपीठ टीम

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई आयडिया हॅकॅथॉन २०२२ सह एमएसएमई इनोव्हेटिव्ह स्कीम (इन्क्युबेशन, डिझाइन आणि आयपीआर) चा प्रारंभ केला. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, आत्मनिर्भर भारतामध्ये एमएसएमईची भूमिका महत्त्वाची आहे. या योजना उद्योजकांना नवीन उपक्रम विकसित करण्यास मदत करतील असे ते म्हणाले.

 

एमएसएमई इनोव्हेटिव्ह हा एक समग्र दृष्टीकोन असून ३ उप-घटक आणि उपाययोजना एकत्र करून त्यात समन्वय साधणे हा उद्देश आहे. एमएसएमई इनोव्हेटिव्ह ही एमएसएमईसाठी एक नवीन संकल्पना आहे . यामध्ये इनक्युबेशन, डिझाइन इंटरव्हेन्शन आणि आयपीआरचे संरक्षण करून एमएसएमईना भारतातील नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांना एमएसएमई चॅम्पियन्स बनण्यासाठी प्रेरित केले जाईल. उप-योजनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-

 

इनक्युबेशन :या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे दडून राहिलेल्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन आणि समर्थन देणे आणि एमएसएमईना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे ज्यामुळे त्यांच्या संकल्पना साकार होऊ शकतील. प्रत्येक कल्पनेसाठी १५ लाख रुपयां पर्यंत आर्थिक सहाय्य. आणि संबंधित संयंत्र आणि यंत्रसामुग्रीसाठी १ कोटी रुपयांपर्यंत सहाय्य प्रदान केले जाईल.

 

डिझाईन: या घटकाचा उद्देश भारतीय उत्पादन क्षेत्र आणि डिझाइन कौशल्य यांना एका समान व्यासपीठावर आणणे हा आहे. नवीन उत्पादनाच्या विकासासाठी, त्याच्या सतत सुधारणा आणि विद्यमान/नवीन उत्पादनांमध्ये मूल्यवर्धनासाठी प्रत्यक्ष डिझाइन समस्यांवर तज्ञांचा सल्ला आणि किफायतशीर उपाय प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे. डिझाइन प्रकल्पासाठी ४० लाख रुपये आणि विद्यार्थ्यांच्या प्रकल्पासाठी २.५ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाईल.

 

आयपीआर (बौद्धिक संपदा अधिकार):एमएसएमईमध्ये बौद्धिक संपदा अधिकारांबाबत (IPRs) जागरुकता वाढवण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेत सर्जनशील बौद्धिक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील बौद्धिक संपदा संस्कृती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. . विदेशी पेटंटसाठी ५ लाख रुपये , देशांतर्गत पेटंटसाठी १.०० लाख , जीआय नोंदणीसाठी २.०० लाख, डिझाईन नोंदणीसाठी १५,०००/- ,आणि ट्रेडमार्कसाठी १०,०००/- रुपये पर्यंत वित्तसहाय्य प्रतिपूर्ती स्वरूपात.दिले जाईल.

 

अधिक माहितीसाठी भेट द्या – www.innovative.msme.gov.in

 

पाहा व्हिडीओ:


Tags: MSMEMSME Idea HackathonMSME Innovative SchemeNarayan raneएमएसएमई आयडिया हॅकॅथॉन २०२२एमएसएमई इनोव्हेटिव्ह स्कीमनारायण राणे
Previous Post

स्त्री शक्तीचा सांस्कृतिक जागर! जव्हारच्या स्वयंपाकघरात महिलांचा तारपाच्या सुरांवर जल्लोष!!

Next Post

राज्यातील तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात १२ मार्चला लोक अदालतीचे आयोजन

Next Post
LOk Adalat

राज्यातील तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात १२ मार्चला लोक अदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!