मुक्तपीठ टीम
भिंड कारागृहात आज पहाटे मोठा अपघात घडला आहे. ज्यामध्ये कारागृहातील बॅरेकची भिंत कोसळल्याने २२ कैदी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी कैद्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर या अपघातात कोणत्याही मृत्यूची माहिती नाही.
बॅरेकची भिंत कोसळली
भिंड कारागृहात आज पहाटे मोठा अपघात घडला आहे. ज्यामध्ये कारागृहातील बॅरेकची भिंत कोसळल्याने २२ कैदी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी कैद्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर या अपघातात कोणत्याही मृत्यूची माहिती नाही.
बॅरेकची भिंत कोसळली
- भिंड कारागृहात शनिवारी सकाळी बॅरेकची जीर्ण भिंत कोसळल्याने कारागृहातील २२ कैदी जखमी झाले.
- भिंत कोसळून जखमी झालेल्या कैद्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- भिंड जेलच्या बॅरेक्सची जीर्ण भिंत सुमारे दीडशे वर्ष जुनी होती.
- भिंत कोसळल्यामुळे बॅरेक ६ पूर्णपणे नष्ट झाला आहे.
- जेल रक्षकाला माहिती मिळाली की, बॅरेकचे प्लास्टर पडत आहे, बॅरेकची भिंत कोसळू शकते.
- परंतु, काही करण्याआधीच बॅरेक्सची भिंत कोसळली.
- रक्षक आणि इतर जवानांनी बॅरेकमधील कैद्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली, पण दुर्दैवाने तोपर्यंत भिंत कोसळली होती.
- त्याचबरोबर कारागृहात बंद असलेल्या इतर कैद्यांना अपघातानंतर इतर बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे.
- अपघातानंतर, एसपी आणि आरआय तातडीने घटनास्थळी पोहोचले.
एसपी मनोज कुमार सिंह यांचे म्हणणे आहे की, “आज पहाटे भिंड कारागृहाच्या बॅरेकची भिंत कोसळल्याची माहिती मिळताच आरआय आणि मी आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आणि तत्काळ २२ जखमी कैद्यांना रुग्णालयात नेले.” घटनेची माहिती देताना एसपी मनोज कुमार सिंह म्हणाले की, “२२ जखमी कैद्यांपैकी रोहित सिंह, विजेंदर सिंह, कप्तान सिंह यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.”