Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात, एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर!

ठाणे, नवी मुंबई, पनवेल महापालिकेची पथके महाडमध्ये

July 31, 2021
in घडलं-बिघडलं
0
eknath shinde

मुक्तपीठ टीम

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पुराचा तडाखा बसलेल्या महाड शहराच्या स्वच्छतेसाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरले असून ठाण्यासह विविध महापालिकांचे कर्मचारी व आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीने महाडच्या स्वच्छतेला शनिवारी मोठ्या प्रमाणावर सुरुवात करण्यात आली. नगरविकासमंत्री या नात्याने शिंदे यांनी विविध महापालिकांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची जमवाजमव करून शनिवारी सकाळी महाड गाठले, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शहराची चार भागांत विभागणी केली आणि घरोघरी कर्मचारी पाठवून साफसफाईच्या कामाला सुरुवात केली. या सर्व कामावर भर पावसात फिरून शिंदे स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर, शहराला स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांनी यापूर्वीच ५० लाखांची मदत जाहीर केली होती, मात्र झालेले नुकसान पाहाता ती पुरेशी नसल्याचं निदर्शनास आल्याने वाढीव दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

 

कोकणात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महाड, चिपळूण, खेड या शहरांना बसला. महाड शहरात आणि बाजारपेठेत १३ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब होती ती शहर स्वच्छ करण्याची, महाड नगरपालिकेची क्षमता मर्यादित असल्याने या कामासाठी स्वतः नगरविकास मंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे महापालिकेचे १५० सफाई कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे १२० सफाई कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे १०० सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे ३० जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महापालिकेने पाठवलेले ड्रनेज लाइन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, पाच घंटागाड्या, ठाणे महापालिकेची काही जेटिंग मशिन्स, ठाणे मनपाचे तीन फायर टँकर्स, महाड नगरपालिकेचे तीन फायर टॅंकर्स, तसेच ठाणे व खोपोली वरून घरे स्वच्छ करण्यासाठी आणण्यात आलेले स्प्रेइंग मशीन्ल, रोगराई पसरू नये यासाठी धूरफवारणी करणारी फॉगिंग मशिन्स अशा समुग्रीचा समावेश आहे.

 

शनिवारी सकाळी नऊ वाजता शिंदे यांनी जिल्हा मदत केंद्रात परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येकाला जबाबदारी नेमून दिली. महाड शहरात पूर ओसरल्यानंतर १५ लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले आहेत. ही साथ वाढू नये, तसेच इतर रोगही शहरात पसरू नयेत यासाठी आपण स्वतःच या स्वच्छता कामासाठी पुढाकार घेतला असून सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. पुढील दोन दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड शहराचे मुख्याधिकारी जीवन पाटील आणि इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 


Tags: Eknath Shindeflood areaMahadएकनाथ शिंदेनरेश म्हस्केमहाड
Previous Post

मध्यप्रदेशात कारागृहाची भिंत कोसळून २२ कैदी गंभीर जखमी

Next Post

“कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढा, पण विकास कामांवर परिणाम नको!”

Next Post
Ajit pawar

"कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढा, पण विकास कामांवर परिणाम नको!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!