Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोनू सुदने जमवले १९ कोटी, मदतीवर खर्च केले फक्त २ कोटी!

आयकर शोध मोहिमेच्या टायमिंगमुळे वाद, पण धक्कादायक गौप्यस्फोट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sonu sood

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटकाळातील मदतीमुळे प्रत्यक्ष जीवनातील महानायकाची प्रतिमा तयार झालेला अभिनेता सोनू सुद आयकर विभागाच्या कारवाईमुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. सोनू सुदने दिल्लीतील आप सरकारच्या एका शालेय शैक्षणिक उपक्रमाची मेन्टॉरशिप घेतल्यामुळे भाजपाच्या इशाऱ्यावर कारवाईचा आरोप झाला. परंतु या अभिनेत्याविरोधातील कारवाईच्या टायमिंगबद्दल वाद असला तरी या शोधमोहिमेत समोर आलेली काही माहिती धक्कादायक मानली जात आहे.

 

सोनू सुदच्या व्यवहारांवरील गंभीर आक्षेप

  • सोनू सुदने स्थापन केलेल्या एका संस्थेच्या नावे यावर्षीच्या एप्रिलपासून आजवर १८ कोटी ९४ लाख रुपयांच्या देणग्या जमा केल्या आहेत.
  • त्यापैकी फक्त १ कोटी ९० लाख रुपयेच या काळात विविध प्रकारच्या मदतकार्यावर खर्च करण्यात आले आहेत.
  • तर उर्वरित १७ कोटी रुपये या संस्थेच्या बँकेच्या खात्यात आजपर्यंत वापराविना पडून असल्याचे आढळले आहे.
  • तसेच परदेशी देणगीदारांकडूनही २ कोटी १० लाख रुपयांच्या देणग्या सोनूच्या संस्थेने स्वीकारणे हा एफसीआरए कायद्याचा भंग आहे.

 

आयकर कारवाई कुठे कुठे?

  • आयकर विभागाने मुंबईत एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या विविध संकुलांमध्ये तपासणी केली.
  • पायाभूत सुविधा विकासात कार्यरत असलेल्या लखनौच्या एका उद्योग समूहावर देखील छापे घातले.
  • मुंबई, लखनौ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथील एकूण २८ संकुलांवर छापे घालून शोधमोहीम राबवण्यात आली आहे.

 

बेहिशेबी उत्पन्न लपवण्यासाठी बनावट कर्जांचा फंडा!

या अभिनेत्याच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या संकुलांमध्ये राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे आढळले आहेत. आपले बेहिशोबी उत्पन्न लपवण्यासाठी सोनू सुद अनेक बनावट आस्थापनांच्या माध्यमातून तारणविरहित बनावट कर्जाचे वाटप करण्याच्या पद्धतीचा अवलंब करत होता.

 

आतापर्यंतच्या चौकशीत अशा प्रकारच्या वीस नोंदी उघड झाल्या आहेत. या पुरवठादारांनी अशा प्रकारच्या बनावट नोंदी केल्याचे मान्य केले आहे. रोख रकमेच्या बदल्यात धनादेश जारी केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. कर चुकवण्यासाठी खातेवहीत व्यावसायिक पावत्या कर्जाच्या रुपात दाखवण्यात आल्या होत्या. चौकशीत असे देखील आढळले की या बनावट कर्जांचा वापर गुंतवणुकीसाठी आणि मालमत्ता खरेदीसाठी केला जात होता. या माध्यमातून आतापर्यंत २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा कर चुकवण्यात आला आहे.

 

२१ जुलै २०२० रोजी या अभिनेत्यांना स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थेने १-४-२०२१ पासून आतापर्यंत १.९४ कोटी रुपयांच्या देणग्या जमा केल्या आहेत आणि त्यापैकी १.९ कोटी रुपये विविध प्रकारच्या मदतकार्यावर खर्च करण्यात आले आहेत तर उर्वरित 17 कोटी रुपये या संस्थेच्या बँकेच्या खात्यात आजपर्यंत वापराविना पडून असल्याचे आढळले आहे. तपासात असे देखील आढळले आहे की परदेशी देणगीदारांकडूनही २.१ कोटी रुपयांच्या देणग्या या धर्मादाय संस्थेने स्वीकारल्या आहेत आणि हा एफसीआरए कायद्याचा भंग आहे.

 

लखनौच्या बांधकाम प्रकल्पात सोनूची मोठी गुंतवणूक

लखनौच्या एका पायाभूत सुविधा समूहाच्या विविध संकुलांवर एकाच वेळी छापे घालण्यात आले ज्या समूहामध्ये हा अभिनेता एका संयुक्त बांधकाम प्रकल्पामध्ये सहभागी झाला होता आणि त्याने यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधीची गुंतवणूक केली होती. यामधून करचुकवण्याशी संबंधित आणि खातेपुस्तकांमध्ये अनियमितता आढळली आहे.

 

गुंतवणूक केलेल्या समुहाचा बनावट पावत्यांचा धंदा!

हा समूह उपकंत्राटी खर्चाच्या बनावट पावत्या बनवण्यामध्ये आणि निधी इतरत्र वळवण्यामध्ये गुंतला होता असे तपासात आढळले आहे. अशा प्रकारच्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या बनावट कंत्राटांचे पुरावे सापडले आहेत. बेहिशोबी रोख रक्कम, बेहिशोबी भंगार विक्री आणि बेहिशोबी रोख रकमेच्या व्यवहारांचा डिजिटल डेटा यांचे पुरावे सापडले आहेत. त्याशिवाय हा पायाभूत सुविधा समूह/कंपनी जयपूरच्या एका कंपनीसोबत 175 कोटी रुपयांच्या बनावट वर्तुळाकार व्यवहारातही सहभागी होता. चुकवलेल्या करांचे एकूण आकारमान निर्धारित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

 

सोनूकडून १ कोटी ८० लाखाची रोख रक्कम जप्त!

छाप्यादरम्यान १.८ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे आणि ११ लॉकर्स प्रतिबंधात्मक आदेशाखाली ठेवण्यात आले आहेत. ही शोधमोहीम अजूनही सुरू आहे आणि पुढील तपास प्रगतीपथावर आहे.


Tags: BJPcoronamumbaisonu soodआयकरकोरोनाभाजपामुंबईसोनू सुद
Previous Post

“राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करावी”: डॉ. राजू वाघमारे

Next Post

‘मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे’ हा केंद्रासाठी ठरणारा हजार ते दीड हजार कोटी उत्पन्नाचा ‘सुपर गेट वे’!

Next Post
Mumbai-Delhi expressway

'मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे' हा केंद्रासाठी ठरणारा हजार ते दीड हजार कोटी उत्पन्नाचा 'सुपर गेट वे'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!