मुक्तपीठ टीम
टेक्नॉलॉजी आणि आयटी कंपन्या आपल्या कर्मचार्यांना कंपनीसह जोडून ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांच्यावतीने चांगलं काम करणाऱ्यांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीचं चीज करण्याचे प्रयत्न सुरु असतात. आता एचसीएलचे पाहा ना. त्यांनी आपल्या टॉप परफॉर्मर्ससाठी चक्क मर्सिडिझ कार देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाकडे सादर केला आहे.
याआधी २०१३ मध्ये कंपनीने ५० मर्सिडीझ बेंझ गाड्या टॉप परफॉर्मर्सना दिल्या होत्या. पण नंतर ती प्रथा बंद झाली. आता आयटी सेक्टरमधील रिप्लेसमेंट हायरिंग किंमत १५ ते २०% जास्त आहे. त्यामुळेच एचसीएलने पुन्हा मर्सिडिझ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला मंजुरी मिळाली की एचसीएलमधील कुणीही मर्सिडिझमध्ये दिसलं की तो टॉप परफॉर्मरच हे वेगळं सांगायला नकोच!
२०२१-२०२२मध्ये २२,००० फ्रेशर्सच्या नियुक्तीची योजना
• चालू आर्थिक वर्षात एचसीएल टेक्नॉलॉजीजची २२,००० फ्रेशर्स ठेवण्याची योजना आहे.
• मागील वर्षी ही भरती १५,६०० होती.
• एचसीएलकडे तीन वर्षांची रोख प्रोत्साहन योजनेसह एक चांगले रीटेन्शन पॅकेज आहे. जे दर वर्षी सीटीसीच्या ५० ते १००% असतो.
• लीडरशीप टीम्समधील कमीतकमी १०% महत्त्वपूर्ण प्रतिभांना याचा फायदा झाला आहे.
नोकरीच्या ऑफर नाकारणारेही बरेच
• भारतीय आयटी कंपन्या नोकरीच्या ऑफर नाकारणाऱ्या उमेदवारांशीही व्यवहार करत आहेत.
• नोकरी नाकारण्याची टक्केवारी आज खूप जास्त आहे, कारण आता बर्याच संधी उपलब्ध आहेत.
• त्यामुळेच आयटी कंपन्यांसाठी कौशल्य असलेले मनुष्यबळ टिकवणं हे खूप महत्वाचं आहे.
• त्यामुळेच मग मर्सिडिझ बेंझसारखे पुरस्कार ठरवले जात आहेत.