Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सौरऊर्जा वाढवणार इस्त्रोचा कल्क्युलेटर!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Solar Power Calculator

मुक्तपीठ टीम

ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल या समस्या आता जगभर गंभीर समस्या मानल्या जात आहेत. हरित उर्जेकडे वळण्याची गरज वाढत असली तरी, बदल तेवढ्या वेगाने होत नाही. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्त्रोने जगभरात सौरऊर्जा निर्मिती केंद्रांच्या स्थापनेसाठी सर्वात योग्य ठिकाणे ओळखण्याची पद्धत तयार केली आहे. पृथ्वी निरीक्षण उपग्रहांकडून मिळालेल्या डेटाचा वापर करून इस्रोने सोलर कॅल्क्युलेटर अॅप तयार केलंय.

सध्या जग हे सौरऊर्जेकडे जास्तीत जास्त वळण्याचा प्रयत्न करतेय. पण त्यासाठी सर्वात जास्त योग्य ठिकाण कोणतं ते ठरवणं सोपं नसतं. इस्त्रोनं तयार केलेलं सोलार कॅल्क्युलेटर अॅप विविध प्रदेशांमध्ये सोलर पॅनेल स्थापित करण्यासाठी तेथे असलेल्या फायद्यांची गणना करू शकते. सौर ऊर्जा मिळवण्यासाठी फोटोव्होल्टेइक सोलर पॅनेल स्थापित करण्यासाठी त्याचा फायदा होईल. सोलर कॅल्क्युलेटर हे वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड या उपक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे. सोलर कॅल्क्युलेटर जगभरातील सौर उर्जा ग्रीडमार्फत सर्वत्र, सर्व वेळ स्वच्छ ऊर्जा सुनिश्चित करू शकते.”

इस्रोच्या सौर कॅल्क्युलेटरमुळे वन सन, वन वर्ल्ड वन ग्रीड उपक्रमाला मिळणार बळ 

  • ग्लासगो येथे COP26 ग्लोबल क्लायमेट समिटमध्ये, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की इस्रो जगाला सोलर पॉवर कॅल्क्युलेटर भेट देत आहे.
  • या शोधामुळे वन सन, वन वर्ल्ड वन ग्रीड उपक्रमाला बळ मिळेल.
  • सोलर कॅल्क्युलेटर हा एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रस्ताव होता जो पृथ्वी निरीक्षण उपग्रहांकडील डेटा वापरून तयार करण्यात आला आहे.
  • जगभरात उपग्रह डेटा वापरणे आणि संभाव्य क्षेत्रे ओळखणे ज्यामध्ये दरवर्षी जास्तीत जास्त सौर ऊर्जा उपलब्ध आहे.
  • इस्रो हा डेटा गोळा करणार आहे, त्याचे विश्लेषण करणार आहे, त्याचे मॅपिंग करणार आहे आणि तो ऑनलाइन आणि मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे शेअर करणार आहे.
  • या डेटाचे मॅपिंग करणे आणि ते सामायिक करणे देशांना त्यांचे आगामी सौर ऊर्जा प्रकल्प ठरवण्यास मदत करेल.

सौरऊर्जेसाठी सोलर कॅल्क्युलेटर चांगलेच उपयोगी ठरेल

  • इस्रो फक्त डेटा वापरत, मॅपिंग आणि विश्लेषण करत आहे.
  • या प्रकल्पासाठी ते कोणत्याही हार्डवेअरवर काम करत नाही.
  • अहमदाबादच्या स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरने सौरऊर्जेच्या संभाव्यतेच्या गणनेसाठी अँड्रॉइड अॅप्लिकेशन विकसित केले आहे.
  • सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी पीव्ही सौर पॅनेलच्या स्थापनेसाठी हे एक अतिशय उपयुक्त साधन असेल.
  • मोबाइल अॅप युजर्सना किलोवॅट/चौरस मीटर मध्ये सौरऊर्जेच्या संभाव्यतेशी संबंधित सर्व डेटा प्राप्त करण्यास अनुमती देईल.
  • हे भारतीय भूस्थिर उपग्रह डेटा वापरून प्रक्रिया केलेले मासिक आणि वार्षिक सौर क्षमता प्रदान करते.
  • वास्तविक सौर क्षमतेची गणना करण्यासाठी ते मासिक कमाल आणि किमान तापमान देखील प्रदान करेल.
  • इस्रोने पवन, सौर आणि लहरी ऊर्जा संसाधने देखील जोडली आहेत.
  • पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या वरच्या भूस्थिर कक्षेत असलेल्या उपग्रहांमधून मिळालेल्या पृथ्वी निरीक्षण डेटाच्या मदतीने याचे मूल्यांकन केले जाऊ शकते.

पाहा व्हिडीओ:


Tags: Good news MorningisroISRO Solar Power Calculatorpm modiSolar Power Calculatorइस्रो सौर कॅल्क्युलेटरगुड न्यूज मॉर्निंगपंतप्रधान नरेंद्र मोदीसोलर पावर
Previous Post

ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा रमेश लटकेंना दिलासा! आता अंधेरीत कोण लढणार शिंदे गट की भाजपा?

Next Post

चंद्रावर २०२५पर्यंत शास्त्रज्ञांद्वारे रोपं लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार, मानवी वस्ती स्थापन करण्याची तयारी!

Next Post
Plants On the Moon

चंद्रावर २०२५पर्यंत शास्त्रज्ञांद्वारे रोपं लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार, मानवी वस्ती स्थापन करण्याची तयारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!