मुक्तपीठ टीम
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक, स्टेनोग्राफर, स्वायत्त संस्था असिस्टंट, स्वायत्त संस्था पर्सनल असिस्टंट या पदांवर एकूण ५२६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) ६०% गुणांसह पदवीधर २) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
- पद क्र.२- १) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/ सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव २) इंग्रजी स्टेनोग्राफी ३) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
- पद क्र.३- १) ६०% गुणांसह पदवीधर २) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
- पद क्र.४- १) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/ सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव २) इंग्रजी स्टेनोग्राफी ३) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
- पद क्र.५- १) ६०% गुणांसह पदवीधर २) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
- पद क्र.६- १) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/ सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव २) इंग्रजी स्टेनोग्राफी ३) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाइट https://www.isro.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://apps.ursc.gov.in/CentralOCB-2022/advt.jsp
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1m-oCJp-3T07HHjmT1oljbmE_bty9WfYV/view