Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण सुरू ! – डॉ. नील माधव दास

‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

July 30, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Dr. Neel Madhav Das

मुक्तपीठ टीम

पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्याला मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला. तेव्हापासून शालेय पाठ्यपुस्तकांत अकबर, टीपू सुलतान आदी मुसलमान आक्रमकांचे धडे शिकवले जाऊ लागले. ते आजपर्यंत चालूच आहे. एकूणच ‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षण क्षेत्राचे इस्लामीकरण चालू आहे. हा शिक्षण जिहादच आहे. जोपर्यंत भारत संवैधानिक दृष्टीने हिंदु राष्ट्र बनत नाही, तोपर्यंत देशाच्या शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत इस्लामीकरण सुरूच राहिल, असे स्पष्ट प्रतिपादन झारखंड येथील ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

झारखंड येथील ‘पांचजन्य’चे पत्रकार श्री. रितेश कश्यप म्हणाले की, झारखंड राज्यात राजधानी रांचीसह, दुमका, जामताडा, गढवा, पलामू, पाकूर, बोकारो आदी जिल्ह्यांत सरकारी शाळांना रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी देणे, हिंदीऐवजी उर्दूला प्राधान्य देणे, या गोष्टी सामाजिक माध्यमे तथा प्रसारमाध्यमांतून उजेडात आल्या. सरकारी आदेशाशिवाय केवळ संख्याबळाच्या आधारे मुसलमानांकडून शेकडो शाळांमध्ये गेली 10 ते 25 वर्ष हे घडवून आणले जात आहे. मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व सुरू आहे. झारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहे; मात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत.

हिंदु जनजागृती समितीचे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी म्हणाले की, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर बहुतेक शिक्षणमंत्री हे मुसलमान किंवा मुसलमान धार्जिणे होते. त्यामुळे शिक्षणात चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या. एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकांमध्ये आक्रमक मोगलांचे उदात्तीकरण करण्यासाठी पानेच्या पाने खर्ची घालण्यात आली आहेत. एन्.सी.ई.आर्.टी.च्या 5 वी च्या इंग्रजीच्या पुस्तकात ‘दी लिटल बुली’ या धड्यात ‘हरि’ नावाचा विद्यार्थ्या मुलींची छेड काढणारा, तर ‘अब्दुल’ नावाचा विद्यार्थी चांगले काम करणारा दाखवला आहे. यातून डाव्या विचारांच्या लोकांनी पद्धतशीरपणे हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. बालभारतीच्या पुस्तकातही ‘अफजलखानवधा’चे चित्र नाही; पण ‘ईदगाह’ हा धडा शिकवला जात आहे. गोव्याच्या एका पाठ्यपुस्तकात बार्देश प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तीन दिवस आक्रमण करून जनतेवर अत्याचार केला, असा खोटा इतिहास शिकवला जात होता. एकूणच पालकांनी जागृत होऊन मुलांच्या अभ्यासक्रमांत नेमके काय शिकवले जाते, हे सुद्धा तपासले पाहिजे.


Tags: Dr. Neil Madhav DasEducation Jihad'Government NewsIndiaIslamization of EducationmuktpeethOnline Special DialogueSecular Wordsऑनलाईन विशेष संवादघडलं-बिघडलंडॉ. नील माधव दासभारतमुक्तपीठशिक्षण जिहादशिक्षणाचे इस्लामीकरणसरकारी बातमीसेक्युलर शब्द
Previous Post

झोपी गेलेल्या ईडी सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्यास वेळ नाही!: नाना पटोले

Next Post

कर्नाटकातील भाजपा पदाधिकारी का देत आहेत राजीनामे? जाणून घ्या हत्या आणि राजकारणाचं रक्तचरित्रम…

Next Post
why bjp office bearers resigns from their posts in karnataka

कर्नाटकातील भाजपा पदाधिकारी का देत आहेत राजीनामे? जाणून घ्या हत्या आणि राजकारणाचं रक्तचरित्रम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!