Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

झोपी गेलेल्या ईडी सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्यास वेळ नाही!: नाना पटोले

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
nana patole

मुक्तपीठ टीम

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारच्या मदतीकडे आशेने पहात आहे परंतु राज्यात झोपे गेलेले, आंधळे, बहिरे ईडी सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही म्हणून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहे. या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस राज्य सरकारकडे प्रयत्न करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

nana patole

गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेटी देऊन शेतकरी व गावकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नेते राज्यांच्या अनेक जिल्ह्यात दौरा करीत आहेत. झोपी गेलेल्या सरकारला जागे करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. काँग्रेस नेते व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देण्याचे काम करत आहेत. मुसळधार पावसात लोकांचे बळी गेले, जनावरे मेली, शेतातील पिके गेली. घरांची पडझड झाली आहे पण सरकारला जाग आली नाही, प्रशासनामध्येही अनास्था आहे. आम्ही नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री, मुख्य सचिव व राज्यपाल यांनाही सादर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

nana patole

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावे पुराने वेढलेली आहेत. याभागातील जमीन पाण्याखाली गेली आहे. याला तेलंगणा सरकारचा मेडीगट्टा प्रकल्प कारणीभूत आहे. २०१४-१९ दरम्यान भाजपाचे सरकार राज्यात असताना त्यांच्या व तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या सहकार्याने मेडीगट्टा प्रकल्पाला हातभार लावला गेला. याप्रश्नी मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारशी यासंदर्भात बोललो होतो पण आजचे जे नुकसान होत आहे ते भाजपा सरकारचेच पाप आहे.

गडचिरोली दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन पूरपरिस्थिती बाबत आढावा घेतला व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, पेंटाराम तलांडी, जिल्हाधिकारी संजय मीना, डॉ. नामदेव किरसान, संदीप गड्डमवार, शहर अध्यक्ष सतिश विधाते, जेसा मोटवाणी आदी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या वर्धा जिल्ह्याला भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.


Tags: ED GovernmentFarmers' LossGovernment Newsmaharashtra governmentmuktpeethnana patoleईडी सरकारघडलं-बिघडलंनाना पटोलेमहाराष्ट्र सरकारमुक्तपीठशेतकऱ्यांचे नुकसानसरकारी बातमी
Previous Post

महात्मा फुले, क्रांतिजोती सावित्रीबाईंविषयी बडबडणं, मुंबईतून गुजराती-मारवाडी गेले तर धमकावणं! अशा राज्यपालांचं करायचं काय?

Next Post

‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण सुरू ! – डॉ. नील माधव दास

Next Post
Dr. Neel Madhav Das

'सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण सुरू ! - डॉ. नील माधव दास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!