Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधी पैसे न देता रेल्वे तिकीट बुक करता येणारी ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ सुविधा उपलब्ध!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
IRCTC

मुक्तपीठ टीम

आयआरसीटीसी ही आपल्या नवनवीन सेवा-सुविधांनी सज्ज असते. ती त्यांच्या नवीन योजनांसाठी नेहमीच ओळखली जाते. आयआरसीटीसी रेल्वे प्रवाशांना दिलासा देत ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ सुविधा आता सुरू करत आहे. या सुविधेमुळे रेल्वे प्रवासी कोणतेही पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकतील. बुकिंगच्या वेळी प्रवाशांना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. एवढेच नाही तर प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार तिकीटाचे पैसे भरण्याची सूट मिळणार आहे.

‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ सुविधा काय आहे?

  • आयआरसीटीसी यात्रा अॅप ९० दशलक्षाहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहेत आणि त्यावर दररोज १५ लाखांहून अधिक तिकिटे बुक केली जाऊ शकतात.
  • ‘Travel Now Pay Later’ नावाची ही सुविधा CASHe नावाच्या पेमेंट अॅपच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे.
  • प्रवाशांना हवे असल्यास ते ईएमआयद्वारे तिकिटाची किंमत देखील देऊ शकतात.
  • हा पर्याय आयआरसीटीसी ट्रॅव्हल अॅपच्या चेकआउट पेजवर उपलब्ध असेल.

डिजिटल कर्ज देणार्‍या अॅप कॅशेने आईआरसीटीसी रेल कनेक्टवर ‘Travel Now Pay Later’ पेमेंट पर्याय ऑफर करण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनसोबत भागीदारी केली आहे. या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना ईएमआयद्वारे पैसे देणे शक्य होईल. प्रवासी तीन ते सहा महिन्यांसाठी ईएमआय आणि रोख पेमेंट पर्यायांसह आयआरसीटीसी अॅपवर रेल्वे तिकीट बुक करू शकतात.

ज्या प्रवाशांनी आरक्षित आणि तत्काळ तिकिटे बुक केली आहेत त्यांच्यासाठी ईएमआय पेमेंट पर्याय आयआरसीटीसी यात्रा अॅपच्या चेकआउट पेजवर उपलब्ध असेल.

प्रवाशांना ‘ही’ सुविधा कशी मिळेल?

  • या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाला फक्त अर्ज करणे आवश्यक आहे.
  • हे प्रवाशाच्या CIBIL स्कोअर आणि मोबाइल डेटाचे मूल्यांकन करते आणि ज्यांना क्रेडिट दिले जाऊ शकते त्यांची ओळख पटवते.
  • ज्या प्रवाशाचे CIBIL रेकॉर्ड चांगले आहे त्यांना ‘पे लेटर’ ची सुविधा लवकर मिळू शकते.

 


Tags: good newsindian railwaysirctcmuktpeethTravel Now Pay Letter Facilityuseful newsआयआरसीटीसीउपयोगी बातमीचांगली बातमीट्रॅव्हल नाऊ पे लेटर सुविधाभारतीय रेल्वेमुक्तपीठ
Previous Post

अंबानींचं लक्ष आता साडेचार हजार कोटींच्या मिठाई धंद्यावर, रिलायन्स रिटेल स्टोअरवर ५०पेक्षा जास्त मिठाया मिळणार!

Next Post

भारतीय बाजारात आलिशान मर्सिडीज गाड्यांच्या विक्रीत वाढ!

Next Post
Mercedes

भारतीय बाजारात आलिशान मर्सिडीज गाड्यांच्या विक्रीत वाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!