मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वे म्हणजेच आयआरसीटीसी प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधा पुरवते. ज्यामध्ये तिकिटपासून ते लोअर बर्थपर्यंत प्राधान्य मिळते. मात्र, अनेकांना याची माहिती नसल्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ कसा बुक करायचा आणि ते कन्फर्म कसं करायचं हे अनेकांना माहिती नसते. अनेक वेळा तिकीट बुकिंगवेळी असे घडते की ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ देण्याची विनंती करूनही त्यांना मधला किंवा वरचा बर्थ मिळतो. त्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी आयआरसीटीसीने महत्त्वपूर्ण माहिती जारी केली आहे.
एका प्रवाशाने काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेला ट्विट केले आणि आरोप केला की, त्याने त्याच्या काकांसाठी लोअर बर्थ बुक केला होता, पण त्याला वरचा बर्थ देण्यात आला होता. त्याच्या काकांना पाय नसल्यामुळे त्यांना वरच्या किंवा मधल्या बर्थमधून प्रवास करणे कठीण जाते. प्रवाशाने त्याच्या ट्विटमध्ये त्याचा पीएनआर नंबर देखील समाविष्ट केला आहे. त्यानंतर आयआरसीटीसीनेही याच ट्विटवर उत्तर दिले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट बुक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.
तक्रार करणाऱ्या व्यक्तीला, आयआरसीटीसीने दिली माहिती…
- आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर हँडलवर तक्रार करणाऱ्या प्रवाशाला उत्तर दिले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ तिकीट कसे बुक करायचे ते स्पष्ट केले.
- “सर, पीएनआर क्र. २४४८४०७९२९ सर्वसाधारण कोट्यात बुक केले आहे.
- तुम्ही सर्वसाधारण कोट्यात खालच्या बर्थला प्राधान्य देऊ शकता, पण बर्थचे वाटप उपलब्धतेवर अवलंबून असते.
- त्यानंतर तुम्हाला आरक्षणाचा “लोअर बर्थ अलॉट असेल तरच बुक करा”चा पर्याय निवडावा लागेल.
- आयआरसीटीसीने पुढे लिहिले, कृपया लक्षात घ्या की सर्वसाधारण कोट्यातील खालच्या बर्थचे वाटप पूर्णपणे उपलब्धतेच्या अधीन आहे आणि त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.
- तसेच, तुम्ही ऑन ड्युटी टीटीईंशी (TTE) संपर्क साधू शकता, ज्यांना गरजूंना खालचा बर्थ देण्यासाठी अधिकृत केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी कसे बुक कराल तिकीट?
- आयआरसीटीसीच्या अधिकृत पेजवर लॉगिन करा.
- लॉगिन करून, तुम्हाला हव्या असलेल्या गाडीचे तिकीट बुक करताना, बर्थ प्रेफरेंस असा पर्याय दिसेल या ठिकाणी लोअर बर्थ हा पर्याय निवडा.
- तसेच कोटा ज्येष्ठ नागरिक सिलेक्ट करायला विसरू नका.
आयआरसीटीसीचे नियम काय आहेत?
- नियमांनुसार, सर्व गाड्यांमधील स्लीपर क्लासमध्ये प्रत्येक कोचमध्ये सहा लोअर बर्थ आणि एसी ३ टियर आणि एसी -२ टियर क्लासमधील प्रत्येक डब्यात ३ लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.
- त्याचवेळी, ट्रेन सुटल्यानंतर खालचा कोणताही बर्थ रिकामा असल्यास वरचा किंवा मधला बर्थ मिळालेल्या कोणत्याही दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक किंवा गर्भवती महिलेच्या विनंतीनुसार तसे केले जाईल.
- चार्टमध्ये आवश्यक बदल करून ऑन-बोर्ड तिकीट तपासणी करणार्या कर्मचार्यांच्या खाली जागा दिली जाऊ शकते.