मुक्तपीठ टीम
पंजाब हे आपल्या देशातील एक असे राज्य आहे, जे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा समृद्ध ठेवते आणि जपते. पाच नद्यांची ही भूमी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. याशिवाय पंजाब हे गुरु परंपरा आणि शीख धर्माचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे केंद्र आहे. ही भूमी गुरु नानक आणि यांच्यासह अनेक संत आणि स्वातंत्र्य सैनिकांचे जन्मस्थान आहे. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठेतरी भेट देण्याचा विचार करत असाल तर पंजाबमधील सर्वात मोठे शहर अमृतसर हे पर्यटनाच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असू शकते.
आयआरसीटीसी अमृतसरला भेट देण्याची योजना आखत असलेल्या लोकांसाठी अतिशय जबरदस्त टूर पॅकेजेस देत आहे. अत्यंत कमी खर्चात हा आयआरसीटीसी दौरा बुक करून अमृतसरला भेट देणे शक्य झाले आहे.
अमृतसर टूर पॅकेजविषयीची सविस्तर माहिती
- अमृतसरची ही टूर सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून सुरू होईल.
- नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून, पर्यटक स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेसने अमृतसरला जाण्यास निघतील.
- अमृतसरला पोहोचल्यावर प्रवाशांना हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात येईल.
- हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांती केल्यानंतर प्रवासी संध्याकाळी वाघा बॉर्डरवर जातील.
- वाघा बॉर्डरवरून प्रवासी परत हॉटेलवर पोहोचतील.
- दुसऱ्या दिवशी, नाश्ता केल्यानंतर, पर्यटक सुवर्ण मंदिर आणि जालियनवाला बागला भेट देतील.
- यानंतर, प्रवासी हॉटेलमध्ये परततील आणि दुपारच्या जेवणानंतर, प्रवासी अमृतसर रेल्वे स्थानकावरून दिल्लीला परततील.
- अमृतसरच्या या १ रात्र आणि २ दिवसांच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला ५,७८० रुपये खर्च करावे लागतील.
- या पॅकेजमध्ये स्वर्ण शताब्दी ते अमृतसर आणि परतीचे तिकीट बुक केले जाईल.
- ऑन बोर्ड ब्रेकफास्ट, रेल्वे स्थानकावरून एसी गाडीने ड्रॉप सेवा, एसी रूम, जेवणाची सुविधा आणि पर्यटन स्थळांसाठी एसी गाड्यांची व्यवस्था हे सर्व या टूर पॅकेजमध्ये केले जाईल.