Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील पहिले ई-ऑटोरिक्षा विक्री दालन सुरू, गॅस-पेट्रोलच्या कटकटीतून मुक्ती

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
E-Rikshaw

मुक्तपीठ टीम

देशभरात दिवसेंदिवस होत चाललेली इंधन दरवाढ लक्षात घेता रिक्षाचालक सीएनजीकडे वळले. पण ते इंधनही आता महाग होऊ लागले आहे. त्याचवेळी समोर पर्याय आला तो ईलेक्ट्रिक गाड्यांचा. मात्र, ई-स्कूटर किंवा ई-कारची जेवढी आक्रमक मार्केटिंग सुरु आहे, तेवढी सामान्यांच्या गरजेच्या ईलेक्ट्रिक रिक्षांची होताना दिसत नाही. त्यामुळेच शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेच्या पुढाकाराने आणि ए व्ही मोटर्स यांच्या माध्यमातून सुरु झालेले पहिले ईलेक्ट्रिक रिक्षा शोरूम ही चांगली बातमी आहे. मुंबईतील हे पहिले ई-ऑटोरिक्षा विक्री दालन नुकतेच सुरू करण्यात आले. शिवसेना नेते, माजी मंत्री, खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते पियाजो अॅपे कंपनीच्या प्रवासी आणि मालवाहतुक या दोन्ही वर्गवारीतील ई-ऑटोरिक्षा वाहनांचे अनावरण आणि वाहने खरेदी केलेल्या ग्राहकांना चाव्यांचे वितरण यावेळी करण्यात आले.

केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशात आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाने देखील ई-वाहन धोरणास यापूर्वीच मान्यता दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक आणि ग्राहकांची आर्थिक बचत या सर्व दृष्टीने विचार करता शासन देखील याकरीता विविध स्तरावर प्रोत्साहन आणि अनुदान उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेतील गरज लक्षात घेता मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील प्रवासी आणि मालवाहतुक रिक्षाचालकांचे लक्ष वेधण्यासाठी शिव वाहतूक सेनेने संघटनेच्या सदस्य ऑटोरिक्षा चालकांनादेखील ई-ऑटोरिक्षा वाहन खरेदीवर विशेष सवलतीचा लाभ देऊ केला आहे.

 

इंधनावर चालणार्‍या वाहनांमुळे होणारे मानवी शरीरास हानिकारक असे कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आणि गोरगरीब रिक्षाचालकास कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन हा भविष्यासाठी अतिशय उत्तम पर्याय ठरेल असे प्रतिपादन गजानन किर्तीकर यांनी यावेळी केले. शिवाय राज्यभर विविध ठिकाणी रिक्षानाक्यांवर ई-वाहनांविषयीची जागरूकता होणे देखील तितकीच गरजेची असून शिव वाहतूक सेनेने याबाबतीतही पुढाकार घ्यावा अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रसंगी राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त सचिन गिरी, शिव वाहतूक सेनेचे माजी सरचिटणीस मोहन गोयल, विधानसभा संघटक प्रमोद सावंत, संघटक कमलेश राय, पियाजो अॅपे कंपनीचे झोनल प्रमुख सुधांशु तलवार, विभागीय प्रमुख नितिन दिघडे, सारथी सुरक्षा प्रवक्ते विनय मोरे, युवा विभाग अधिकारी मयूर पंचाळ, ए व्ही मोटर्सचे संचालक अजय जैन, पीयूष जैन यांच्यासह परिसरातील ऑटोरिक्षा चालक मालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Tags: electric rickshawmumbaShivsenashowroomईलेक्ट्रिक रिक्षाईलेक्ट्रिक रिक्षा शोरूमशिव वाहतूक सेनाशिवसेना
Previous Post

आयआरसीटीसीचे जबरदस्त टूर पॅकेज! या सुट्ट्यांमध्ये चला तर मग अमृतसरला

Next Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम सोलापूर) सोलापूरात १७४ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
zp solapur

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम सोलापूर) सोलापूरात १७४ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!