मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनाचे पडसाद कतारमध्ये सुरू झालेल्या फुटबॉल विश्वचषकामध्ये उमटले. इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात देशाचे राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. राष्ट्रगीत सुरू असताना सर्व खेळाडू शांत दिसत होते. याचे कारण इराणमध्ये सुरू असलेली हिजाबविरोधी निदर्शने असल्याचे सांगितले जात आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील पहिला सामना इंग्लंड आणि इराण यांच्यात होत आहे.
जगभरात इराणविरोधी निदर्शनांची आग आणखी भडकणार!!
- कतारमधील खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर इराणचे राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा सुरुवातीचे ११ खेळाडू शांत दिसले.
- फुटबॉलपटूंच्या या कृत्यामुळे जगभरात इराणविरोधी निदर्शनांची आग आणखी भडकण्याची शक्यता आहे.
- विशेष म्हणजे १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण इराणमध्ये निदर्शने सुरू झाली.
- या निदर्शनांमागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमिनीचा मृत्यू.
- इराणमध्ये २२ वर्षीय महसा अमिनी हिला हिजाब न घातल्यामुळे पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले होते.
- पोलिसांनी तिच्यावर कोठडीत मारहाण केल्याचा आरोप आहे, त्यामुळे ती कोमात गेली होती.
- या घटनेच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी अमिनीचा मृत्यू झाला.
महसा अमिनी यांच्या मृत्यूवरून १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतरच्या महसा अमिनीच्या मृत्यूवरुन दोन महिन्यांतील सर्वात मोठे आव्हान इराणसमोर आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ देशव्यापी निदर्शने सुरु आहेत. शेकडो लोक मारले गेल्याची माहिती आहे.