Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील ‘खंडणी’ प्रकरणातील आरोपी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित! अटकेची शक्यता!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
IPS officer Saurabh Tripathi

मुक्तपीठ टीम

मुंबईतील अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबईतील पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृहमंत्रालयानं पाठवला होता. त्या फाइलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सही केल्यानंतर निलंबनाचा मार्ग मोकळा झाला. आता त्यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला तर ते गजाआडही जावू शकतील.

 

उपायुक्त पदावरील सौरभ त्रिपाठी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगडियांच्या व्यवसायाची माहिती मिळाली. अंगडिया हे जुन्या काळातील कुरियर सर्व्हिस मानले जातात. पण ते वस्तूंबरोबरच हिरे, रोख रकमेचीही ने-आण करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची भीती दाखवत त्रिपाठींनी वसुलीचा नवा मार्ग शोधला.

 

आयपीएस सौरभ त्रिपाठींवर माफियांसारखा वसुलीचा आरोप!

  • अंगडिया असोसिएशनने गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली.
  • त्यांनी आरोप केला होता की, मुंबईतील परिमंडळ दोनचे उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अंगडियांना त्यांचा व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी १० लाख रुपये मागितले होते.
  • दर महिन्याला दहा लाख मिळाले तरच कारवाई करणार नाही, असे धमकावले होते.
  • त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हाही नोंदवला.
  • या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने क्राइम ब्रँचने ३ पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
  • जे एलटी मार्ग पोलिसांमध्ये तैनात होते.
  • लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात पीआय ओम वनगटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांना अटक केली आहे.
  • या प्रकरणी १६ मार्च रोजी गुन्हे शाखेने सौरभ त्रिपाठींना पोहिजे आरोपी घोषित केले होते.

 

त्रिपाठींविरोधात ऑडियो क्लिप्सचेही पुरावे!

  • त्रिपाठी हा या प्रकरणात आरोपी असल्याचे सांगितले जाते.
  • मुंबई पोलिसांनी गृह मंत्रालयाला या वसुली प्रकरणाची माहिती दिली.
  • यासोबतच त्रिपाठी यांच्याविरोधातील पुराव्यांचीही माहिती देण्यात आली.
  • त्रिपाठी यांनी तक्रारदाराला फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप असल्याची माहिती दिली.
  • या आरोपाचे समर्थन करण्यासाठी काही ऑडिओ क्लिपही मुंबई पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

 

पोलीस उपायुक्तांची गुन्हेगारासारखी जामीनासाठी धडपड!

  • उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर वसुलीचा आरोप झाल्यामुळे अटकेची टांगती तलवार आहे.
  • आता अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
  • सूत्रांनी सांगितले की त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीन याचिकेत म्हटले आहे की एफआयआरमध्ये त्यांचे नाव यापूर्वी नमूद केलेले नव्हते.
  • तसेच पोलीस ठाण्याच्या पातळीवर अंगडियांकडून पैसे वसूल केले जात असल्याची त्यांना माहिती नव्हती.
  • बुधवारी, २३ मार्च रोजी जामीन अर्जावर सुनावणी आहे.
  • जामीन फेटाळला गेला तर त्यांना अटकेची शक्यता आहे.

Tags: accused IPS officer Saurabh TripathiAngadiya Associationmumbaimumbai policeSaurabh Tripathi suspendedअंगडिया असोसिएशनआरोपी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठीमुंबईमुंबई पोलीससौरभ त्रिपाठी निलंबित
Previous Post

नवीन मासेमारी कायद्यानुसार १६७ अनधिकृत मासेमारी नौकांवर कारवाई

Next Post

सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी – जितेंद्र आव्हाड

Next Post
Jitendra awhad

सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी - जितेंद्र आव्हाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!