मुक्तपीठ टीम
दिवाळीच्या सणासुदीचा वेळ बघता अॅपल कंपनीने आयपॅड प्रो २०२२ बाजारात लाँच केला आहे. हे आयपॅड एम२ प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत. यात अॅपल पेन्सिलचाही सपोर्ट आहे. आयपॅड प्रो २०२२ हा ११ इंच आणि १२.९ इंच अशा दोन आकारात लाँच करण्यात आला आहे.
आयपॅड प्रो २०२२ चे काही खास फिचर्स…
- या टॅबमध्ये एम २ प्रोसेसर आहे.
- यात १६जीबीपर्यंत युनिफाइड मेमरी देण्यात आली आहे.
- या पॅडवरून प्रोआरईएस व्हिडिओही रेकॉर्ड करता येतात.
- हा आयपॅड १२ मिमी अंतरावरूनही पेन्सिल शोधू शकतो.
- आयपॅडला स्पर्श न करता त्यावर पेन्सिलने काहीतरी लिहता येईल.
- ११-इंच टॅबमध्ये १२० एचझेडच्या रीफ्रेश रेटसह लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे.
- १२.९ इंचाच्या मॉडेलमध्ये १२० एचझेड च्या रीफ्रेश रेटसह लिक्विड रेटिना XDR मिनी एलईडी डिस्प्ले आहे.
- आयपॅड प्रो २०२२ थंडरबोल्ट कनेक्टिव्हिटीसह येतो.
- थंडरबोल्ट कनेक्टिव्हिटी 6K रिझोल्यूशन पर्यंत आहे.
- यात टाइप-सी पोर्ट आहे आणि वाय-फाय ६ई सह ब्लूटूथ ५.३ देखील आहे.
आयपॅड प्रो २०२२ मध्ये १२-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल फ्रंट कॅमेरा आहे.
- यात ऍपर्चर f/2.4 आहे.
- मागील बाजूस फक्त १२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
- दुसरी लेन्स १० मेगापिक्सेलची आहे.
- यात चार स्पीकर आणि पाच मायक्रोफोन आहेत.
- ११-इंच आयपॅडचे वजन ४७० ग्रॅम आहे आणि १२.९-इंच आयपॅडचे वजन ६८५ ग्रॅम आहे.
आयपॅड प्रो २०२२ मॉडेलनुसार किंमत…
- आयपॅड प्रो २०२२ वाय-फाय सह ११-इंच सेल्युलर मॉडेलची किंमत ८१,९०० रुपये आहे.
- १२.९ इंच डिस्प्ले वाय-फाय मॉडेलची किंमत १,१२,९०० रुपये आहे.
- वाय-फाय सेल्युलर मॉडेलची किंमत १,२७९०० रुपये आहे.
- हा टॅब सिल्व्हर आणि स्पेस ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
- यासोबत १२८जीबी, २५६जीबी, ५१२जीबी, १टीबी आणि २टीबी स्टोरेज उपलब्ध असेल.
- अॅपल पेन्सिल २ जनरेशनची किंमत ११,९०० रुपये आहे.