मुक्तपीठ टीम
परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. २७ मार्च २०२२ म्हणजेच रविवारपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारकडून कोरोना मार्गदर्शक नियमांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रवास करणाऱ्यांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण हे निर्बंध २७ मार्च २०२२ पासून हटवण्यात येणार आहेत. सर्वप्रथम सरकारने सर्व बाबींचा आढावा घेतला. यानंतर सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स-
- कोरोना मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये ३ जागा रिक्त ठेवण्याचे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे आता क्रू मेंबर्ससाठी संपूर्ण पीपीई किटची गरज नाही.
- विमानतळांवर पॅट-डाऊन तपासणी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- विमानतळावर किंवा विमानात मास्क घालणे आवश्यक असेल.